पीसी- जेसी आणि आऊट

पीसी- जेसी आणि आऊट- ही कथा बोभाटाचे लेखक श्री रामदास यांनी २००८ साली लिहिली होती. ही एक क्राईम स्टोरी आहे.ज्या काळात ती  घडली त्या काळात बँकांचे संगणीकरण झालेले नव्हते.
RBI च्या क्लिअरींग हाऊसमध्ये थोडेफार संगणकीकरण झाले होते.बँकेत भरलेले चेक क्लिअरींग हाऊसला जाऊन मग क्लिअर व्हायचे.त्यातही क्लिअरींगचे पाच सहा झोन्स असायचे.सगळ्यात शेवटी डिव्हिडंड वॉरंट क्लिअर व्हायची.
'हाय व्हॅल्यू क्लिअरींग' नावाचा एक वेगळाच प्रकार असायचाजमा केलेला चेक एक लाखाचा किंवा जास्त असेल तर तो प्रायोरिटीने म्हणजे अग्र्क्रमाने क्लिअर केला जायचा.दुसर्‍या दिवशी खात्यात क्रेडीट मिळायचं.
चेकचा 'फेट' घेण्याचा एक वेगळाच प्रकार होता.पार्टीने दिलेला चेक हमखास पास करून घेण्यासाठी हा उद्योग व्हायचा.काही बँका निवडक ग्राहकांचे चेक डिस्काऊंट पण करायच्याबँक आणि बँकेचे व्यवहार ही एक वेगळीच दुनिया होती.बँकेतून सेवानिवृत्त होऊन साधारण वीस एक वर्षं झालेल्या लोकांना हे कदाचित आठवत असेल.
पण नव्या पिढीला हे सगळं माहिती नसेल म्हणून आम्ही ही कथा संपादित करून पुन्हा सादर करत आहोत.
****
पण ह्या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी माहिती !
'पीसी' म्हणजे पोलिस कस्टडी. 'जेसी'म्हणजे ज्युडीशिअल कस्टडी आणि  'आउट' म्हणजे आरोपीची जामीनावर सुटका.
आय. ओ.म्हणजे इन्व्हेस्टीगेटींग ऑफीसर - चौकशी अधिकारी. पो. नि. म्हणजे आयो शिवाय इतर पोलीस इन्स्पेक्टर.
बाकीची माहिती कथेच्या ओघात येईलच.
ही एका बँक फ्रॉडची कथा आहे.कोणताही मोठा बँक फ्रॉड एखाद्या शेअरच्या पब्लीक इश्युसारखा अंडरराइट होतो
अंडररायटर कोण हे फक्त फ्रॉड उघडकीला आला तरच कळतं.कारण सेटलमेंट करायचीच तर तोच करू शकतो.
आयो सुध्दा सुरुवातीला ह्या प्रश्नाला हात घालत नाही.कारण त्याला तो कधीच पकडू शकत नाही.
मॅटर कोणी वाजवली हे तपासाच्या अंतीम टप्प्यात कळतं.तो पर्यन्त आयोची तुंबडी भरलेली असते.
एकदा केस बनली की त्याचं काम संपलं.तपासाच्या दरम्यान सगळ्यांना अटक होते असं काही नाही.
गुन्हा दाखल करण्यासाठी लॉजीकली ज्यांना ऍरेस्ट करायला पाहिजे त्यांनाच होते.
बाकी बाजार बुणगे बाहेरचं राहतात.
****
हे वाचल्यावर पीसी- जेसी आणि आउट- या कथेची पार्श्वभूमी तुम्हाला सहज समजेल
तर आज संध्याकाळी  वाचू या पीसी- जेसी आणि आउटचा भाग -१ 
एक महत्वाची सूचना :सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.© बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required