संवेदन 'वेबसिरीज गुरुकुल'...आता घरबसल्या शिका वेब सिरीजचं लेखन, पटकथेचं तंत्र आणि बरंच काही !!
वेबसिरीज हे मनोरंजन उद्योगाचे केंद्र होऊ लागले आहे. प्रचंड प्रमाणात गुंतवणूक ह्या वेब सिरीज माध्यमात होऊ लागल्या आहेत. इथून पुढे हा उद्योग दहा वर्षांत किमान पाचपट वाढ दाखवणारा ठरू शकतो. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोसला ही अमेझॉन प्राइम सुरु करावं वाटलं. त्यावरूनच हे माध्यम किती महत्त्वाचं आहे स्पष्ट होतं आहे. भारताची भलीमोठी लोकसंख्या कोणत्याही विषयावर वेब कंटेंट येवो तो पाहणारे, आज करोडो प्रेक्षक तयार होत आहेत. भारतात झालेल्या इंटरनेट क्रांती आणि मुकेश अंबानीही ह्या वेबमार्केटमध्ये मोठी गुंतवणूक घेऊन येत असल्याने येत्या काळात हे क्षेत्र अतिशय आकर्षक क्षेत्र ठरत आहे.
ऑनलाइन जगात तुम्ही मुंबई-पुण्यात असा किंवा अगदी नंदुरबार, तुमच्याकडे वेबसिरियलसाठी उत्तम लिखाण करण्याची क्षमता असेल तर तुम्हाला प्रचंड मागणी आहे. आज अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत, कमीत कमी कलाकार घेऊन शूटिंग होत असल्याने कलाकारांच्या संधीही कमी होत आहेत, मात्र लेखकांकडे मात्र हीच परिस्थिती उलटी असून प्रचंड प्रमाणात त्यांचा लिखाणाला मागणी आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला बंगाली भाषिकांचं वर्चस्व दिसून येत होतं. ह्याचं कारण चित्रपट आणि त्या संबंधी इकोसिस्टीम कोलकाता येथे तयार होत गेली आणि त्यातून अनेक मोठे कलाकार, दिग्दर्शक घडले. वेबसिरियल हे क्षेत्रही आज भारतात तसं नवीन आहे. अशावेळी मराठी भाषेतून ऑनलाइन एक इकोसिस्टीम तयार करावी अशा उद्देशाने संवेदन रायटिंग अकॅडमी वेबसिरीजचे 'गुरुकुल' घेऊन येत आहे.
जशी 'जीवे जीवस्य जीवनम' ह्या तत्वाप्रमाणे जशी इकोसिस्टिम सजीवसृष्टी चालवते, त्याचप्रमाणे आम्ही वेबसिरीज गुरुकुल या उपक्रमात वेब सिरियलसाठीचे लिखाण तर शिकवणार आहोतच, पण इथे वेबसिरियलच्या प्लॅटफॉर्मवरील आघाडीच्या निर्माते आणि चॅनेल प्रतिनिधींना ही आमंत्रित केलं जाईल. जेणेकरून त्यांना निर्मिती करण्यासाठी त्यांना लेखकांकडून नक्की काय हवं आहे? ते त्यांनी कसं सादर करावं? कोणती कथा कोणाला विकता येईल? कशी विकता येईल? आपल्या लिखणाला मोबदला कसा मिळवावा? त्या बाबत कॉपीराईट, रजिस्ट्रेशन आणि कायदेविषयक सल्लाही वेबसिरीज लिखाण करू इच्छिणाऱ्यांसाठी देण्यात येईल.
या उपक्रमात गुरुकुल पद्धतीत अंबर हडप आणि गणेश पंडित यांच्याकडून आपल्याला २ तासांची १६ लाइव्ह सत्रं घेतली जातील. तसेच ४ ग्रुप सेशन्स अशी २० सत्रं घेतली जातील. जेणेकरून लेखन चमू कशा वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनातून लिखाण समृद्ध करू शकतो याचा अनुभव ही आपल्या मार्गदर्शकांचा नेतृत्वाखाली आपल्याला घेता येईल.
२ महिने चालणाऱ्या ह्या उपक्रमात आपल्याला
-वेबसिरियलचे कथाबीज कसे फुलवले जाते?
-पात्रांचा पटकथेत होत जाणारा प्रवास.
-प्रत्येक पात्राला सर्व दृष्टीने आपल्या सिरीजमध्ये जिवंत करण्यासाठी कशा प्रकारे पात्र लिहिले जाते? पात्र लिखाणावर भरपूर सराव.
-पटकथा लेखन त्यातील नरेशनच्या पद्धती आणि त्यातील प्रयोग.
-संवाद लेखन, प्रत्येक पात्र आणि त्याच्या संवादाच्या पद्धती, त्याचा सराव.
-वेबसिरील ह्या प्रकारात उत्कंठेची मात्रा इतर माध्यमांपेक्षा अधिक असल्याने हूक पॉईंट आणि त्यात जगभरात चालत असलेले प्रयोग, भारतीय मानसिकतेच्या माध्यमातून हूक पॉईंट आणि त्यावर भरपूर सराव.
-एपिसोडीक रचना करत असताना कोणता कथा भाग कोणत्या सीजनमध्ये उलगडत जावा? कथेप्रमाणे ह्याची गणिते कशी बदलतात?
-वेबसिरीजमधील प्रतिथयश निर्माते आणि चॅनेल प्रतिनिधींशी थेट संवाद.
वेबसिरीज लेखन हा समुद्र आहे. या प्रकारात स्वतःचा आत्मा कोणत्या प्रकारच्या लेखनात जास्त रमतो आणि वेब कंटेंट मार्केटमध्ये त्यासाठी असलेली गरज ह्याचा आत्मशोध घेण्यासाठी आणि आपल्या लिखाणाची दिशा शोधण्यासाठी आपल्या गुरुकुलातील गुरूंकडून वैयक्तिकरित्या प्रत्येकाला मार्गदर्शन देखील केले जाईल. तसेच प्रत्येकाच्या लिखाणावर वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करणारी ही संवेदनची दोन महिन्यांची ऑनलाइन वेबसिरियल गुरुकुल कार्यशाळा येत्या ६ ऑगस्टपासून सुरु होत आहे. गुरुवार आणि रविवार संध्याकाळ २ महिने लाइव्ह हे गुरुकुल असेल आणि कोणतेही सेशन, कितीही वेळा, ट्रेनिंग ग्रुपवर तुमच्या सोयीप्रमाणे २ महिने पाहता ही येतील.
वेबसिरीजच्या ह्या इकोसिस्टीमचा भाग होण्याची संधी मिळणार आहे केवळ २५ जणांसाठीच. तुमची जागा राखून ठेवा!!
अधिक माहितीसाठी संपर्क-
८६६८३३६७६८
७७१५८३०५७४