टॉयलेट मॅनर्स म्हणजे काय ? 

१ निसर्गाने दिलेल्या सोयीनुसार,पुरुषांना लघवी करताना पँट उतरवण्याची आवश्यकता  नसते.पण केवळ या कारणाने 
बरेचसे पुरुष लघवीला जाताना टॉयलेटचे दार फक्त ओढून घेतात.हे योग्य नाही.


२ लघवीला जाताना कमोडची रींग उचलून वर करण्याची तसदी बरेच जण घेत नाहीत.हे अयोग्य आहे.


३ काहीजण लघवी करताना कमोडपासून दूर उभे राहून लघवी करतात.लघवीची धार सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच लांबीची नसते,हे सांगायला सायन्सची गरज नसतेच.पण त्यामुळे कमोडच्या रींगवर लघवी सांडते आणि काही थेंब फरशीवर पण सांडतात.आपल्याच घरातील इतर सदस्य महिलांना या रींगवरच बसायचे असते याची जाणिव पुरुषांना नसते


४ कमोडमध्ये पडणार्‍या धारेचा आवाज फारसा मनोरंजक नसतो,तेव्हा सतत पाणी फ्लश करणे आवश्यक आहे.


५ टॉयलेटला जाताना एक्झॉस्ट फॅन चालू करण्याचे बरेच जण विसरतात. बर्‍याच वेळा लघवी करताना, गॅस पण बाहेर पडतात आणि तो घाणेरडा वास टॉयलेट्मध्ये कोंडून राहतो. तेव्हा पुरुषांनो एक्झॉस्ट फॅन न विसरता चालू करा.


६ टॉयलेटला जाताना हातात पेपर घेऊन जाऊ नका. नंतर तोच पेपर जंतूंसकट डायनींग टेबल किंवा टीपॉयवर पडलेला असतो. शक्य झाल्यास टॉयलेटमध्ये पेपर, पुस्तक,मोबाईल काहीही नेऊ नका.


७ धार सोडून झाली की फ्लश करायला विसरू नका.आणि हो , तुम्ही ज्या जागी आपला ऐवज रिकामा केला आहे त्या खजिन्याचं झाकण बंद करायला विसरू नका.


८ बर्‍याच वेळा लघवी करताना शेजारीच उभ्या असलेल्या कलीग सोबत उभ्या-उभ्या कॉन्फरन्स करण्याची सवय बहुतेकांना असते. परिणामी धार भांड्याच्या बाहेर पडत राहते.थोडक्यात,हातातल्या कामावर पूर्ण लक्ष द्या.

९ बाहेर पडताना सुगंधी स्प्रे मारूनच बाहेर पडा. स्प्रे नसला तर माचीसची एक काडी जाळून बाहेर पडा. माचिसची काडी जाळल्यावर दुर्गंध नाहीसा होतो.


१० घरातल्या बाथरुममधला ब्रश पुरुषांनी वापरला तर ब्रश नाराज होत नाही.अधूनमधून टॉयलेट स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलाच.


शेवटची एकच सूचना महिलावर्गासाठी- कार्यक्रम संपेपर्यंत बसूनच रहा !!

सबस्क्राईब करा

* indicates required