'नमस्ते लंडन' चित्रपटाची झाली चोरी आणि भरपाई मिळाली ७५ लाखाची !

वाङ्‌मयचौर्य (Plagiarism) हा भारतातला जोरात चालणारा धंदा आहे.
करोडो रुपयांची उलाढाल या धंद्यात होते. पण वाङ्‌मयचौर्य म्हणजे नेमके काय ते आधी वाचा.
“एखाद्या लेखकाची मूळ साहित्यकृती पूर्णतः वा अंशतः दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावे प्रसिद्ध करून ती स्वतःची असल्याचे भासविणे, ह्यास ‘वाङ्‌मयचौर्य’ म्हणतात. वाङ्‌मयचौर्य लेखक मूळ साहित्यकृतीचा निर्माता नसतानाही त्या साहित्यकृतीचा निर्माता असल्याचा दावा करतो. मूळ साहित्यकृती लपविणे, किंवा रूपांतरात तिचा मुळीच उल्लेख न करणे,याला वाङ्‌मयचौर्य असे संबोधतात.”-मराठी विश्वकोश
हा धंदा भारतात चालतो कारण या चोरीची तक्रार करायला फारसे कोणी कोर्टापर्यंत जात नाही.सिनेसृष्टीत तर अशा चोरांचा सुळसुळाट झालेला दिसेल.अशाच एका चोराला एका हिंदी चित्रपट निर्मात्याने  विपुल अमृतलाल शहा  यांनी धडा शिकवला त्याची ही गोष्ट आहे.विपुल अमृतलाल शहा यांच्या चित्रपटाचे नाव होते 'नमस्ते लंडन' अक्षय कुमारा आणि कतरिना कैफचा हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर आठवत असेलच पण ज्यांनी पाहिला नसेल त्यांना या चित्रपटातलं एक गाणं मैं जहाँ रहूँ,मैं कहीं भी हूँ ,तेरी याद साथ है'अजूनही लक्षात असेल.
त्याचं झालं असं या चित्रपटाची हुबेहूब कॉपी एका बंगाली सिनेनिर्मात्याने तयार केली.या बंगाली चित्रपटाचे नाव होते 'परान जाई जलीया रे' देव आणि सुभाश्री गांगुली याचे नायक -नायिका होते. नमस्ते लंडनच्या निर्मात्यानी 'परान जाई जलीया रे' वर  वाङ्‌मयचौर्य (Plagiarism)चा खटला दाखल केला.खालच्या कोर्टाने त्यांचा दावा मान्य करून 'परान जाई जलीया रे' चित्रपटटगृहात प्रदर्शित करण्यावर बंदी घातली.बंगाली सिनेनिर्माते हाय कोर्टात दखल मागायला गेले. हायकोर्टानेही विपुल अमृतलाल शहा यांच्या बाजूने निर्णय दिला. शेवटी कोर्टाबाहेर तडजोड झाली आणि बंगाली निर्मात्यांना श्रीकांत मोहता आणि महेंद्र सोनी यांच्या श्री वेंकटेश एंटरटेनमेन्ट कंपानीने ७५ लाख नुकसान भरपाई दिली.सोबतच चित्रपटातच्या श्रेय यादीत हा चित्रपट 'नमस्ते लंडन' या चित्रपटावर आधारीत आहे असे ही नमूद केले.'परान जाई जलीया रे'चे बजेट होते फक्त २ कोटी रुपये आणि नुकसानभरपाईत गेले ७५ लाख !
ही चित्तरकथा तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही लेखक -कवि- निर्माते असाल तर तुमच्या बौध्दिक संपदेचे अधिकार कायदेशिररित्या सुरक्षित करून ठेवा कारण आसापस चोरांची गर्दी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required