'रेड बुल' या पेयाचा आणि तुमचा आतापर्यंत परिचय नक्कीच झाला असेल.त्यांची फेमस टॅगलाईन किंवा स्लोगन होती "Red Bull Gives You Wings" म्हणजे हे -रेड बुल-प्याल तर तुम्हाला पंख फुटतील.आता या वाक्यात लपलेला अर्थ असा आहे की रेड बुल तुमच्या पंखांना बळ देते.आपल्या मर्यादांना ओलांडून आयुष्यात पुढे झेप घ्या असे रेडबुलवाल्यांना सांगायचे होते.आता एक गमतीची गोष्ट पण वाचा. रेड बुल बाजारात आणण्यापूर्वी एक सर्व्हे करण्यात आला.यासाठी अनेक लोकांना रेड बुलची चव घेऊन त्यांचा अभिप्राय देण्याची विनंती करण्यात आली होती. बहुतांश लोकांनी 'हे मुत्रट चवीचे पेय कोण पिणार' असाच अभिप्राय दिला होता. तरीपण बाजारात आल्यावर स्लोगनच्या जोरावर आणि अर्थात त्यात्ल्या कॅफीनमुळे हे पेय कोकाकोलापेक्षाही जास्त खपायला लागलं.२०१३ साली बेंजामीन कॅराथेर्स नावाचा एक इसम रेड बुल विरोधात कोर्टात गेला. त्याचे म्हणणे असे होते "Red Bull Gives You Wings" हे स्लोगन म्हणजे खोटारडेपणा आहे.तो दहा वर्षे रेड बुल पितो आहे पण त्याला अजूनही पंख फुटलेले नाहीत.त्याचे ऐकून आणखी काही मंडळी कोर्टात गेली. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने ग्राहकांचे म्हणणे बरोबरच असल्याचा निर्वाळा दिला. शेवटी रेड बुल कंपनीला एक कोटी ३० लाख डॉलर्सची मांडवली करावी लागली. आता तुम्ही रेडबुलची टॅगलाईन वाचा ती अशी आहे "Red Bull gives you wiiings".
तुमच्या उत्पादनाची टॅग-लाईन बनवताय ? आधी ही रेडबुलची केस वाचा !
2 मिनिट वाचन

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलबँक घोटाळे नेमके कसे होतात? एका सत्य घटनेमागची चक्रावून टाकणारी कहाणी!बँकांमधील करोडो रुपयांचे घोटाळे नेमके कसे घडतात आणि तपासात काय समोर येते, याचा उलगडा करणारी ही रंजक कहाणी.वाचा →बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

लाइफस्टाइल
कोठडीतील मृत्यू: जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा...
ओडिसातील सुमन बेहराच्या कोठडीतील मृत्यूने भारतीय न्यायव्यवस्थेत कसा बदल घडवला? एका माऊलीने व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची ही सत्यकथा.
६ एप्रिल, २०२६

लाइफस्टाइल
जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ श्वास घेणं नव्हे; ओल्गा टेलिस खटल्याने बदलला भारताचा चेहरा!
मुंबईतील फूटपाथवर राहणाऱ्यांच्या हक्कासाठी लढलेल्या ओल्गा टेलिस खटल्याने भारतीय न्यायव्यवस्थेत 'जगण्याच्या अधिकारा'ची नवी व्याख्या कशी मांडली?
२ एप्रिल, २०२६

लाइफस्टाइल
‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?
२४ फेब्रुवारी, २०२५

लाइफस्टाइल
नबाम रेबिया कोण आहे ? हे नाव सतत चर्चेत का आहे ?
१८ फेब्रुवारी, २०२३

लाइफस्टाइल
मुंद्रा ड्रग केस - फरशीवर सांडलेल्या पावडरीवरून २१,००० करोडच्या गुन्ह्याची उकल कशी झाली? हे धागेदोरे अफगाणिस्तान-इराणपर्यंत पोचले!!
२४ मार्च, २०२२

