फटाक्यांवर अनेक चर्चा सुरुचआहेत पण फटाके बेभरवशाचे असतात.म्हणून काही अनुभवाचे बोल ऐका !
१ आयटम बाँब बरेच मिळतात.सगळेच वाजत नाही. म्हणून शहाणा माणूस एका आयटम बॉंबवर अवलंबून राहत नाही.
२ सुंदर आवरण म्हणजे फटाका वाजेल याची गेरंटी नाही.
३ फटाका साउथचा आयटम आहे. पानकोबी सारखा असतो. भरपूर आवरणे असतात. पण काही वेळा बारुद इल्ला.
४ दाखवायचे आणि वाजवायचे फटाके वेगळे असतात.
५ फटाका चांगला वाजण्यासाठी आधी तापवावा लागतो.
६ बर्याच वेळा वात आधीच गळून पडते. खात्री करून घ्यावी.
७ उदबत्ती तयार ठेवावी.बर्याच वेळा फटाका वात काढून तयार असतो.पण वाकल्यानंतर कळते की उदबत्ती विझली आहे.
८ फटाके वाजवण्यासाठी वाकावे लागते उभ्याउभ्या फटाके वाजत नाहीत.उभ्यानी वाजवायला फुलबाज्या बर्या. त्यामुळे पोटाच्या घेराची काळजी घ्यावी.
९ फटाका वाजणे किंवा न वाजणे ह्यात आपला हात नसतो त्यामुळे ह्या सूचना हलकेच घ्याव्या.
१० हे सगळं मला कळलं कारण 'विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी !!








