मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

वासुदेव बळवंत फडके: ब्रिटिशांच्या गव्हर्नरवरच इनाम जाहीर करणारा क्रांतीकारक

2 मिनिट वाचन

इंग्रज सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले, याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले!

शेअर करा:
वासुदेव बळवंत फडके: ब्रिटिशांच्या गव्हर्नरवरच इनाम जाहीर करणारा क्रांतीकारक

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आज जन्मदिन आहे. इ.स. १८७९ नंतर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र लढा उभा करण्यासाठीया क्रांतीकारकाने देशातील त्याकाळच्या अनेक पुढार्‍यांकडून आणि धनिकांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यात पुरेसे यश न मिळाल्याने मग महाराष्ट्रातील त्याकाळी आर्थिक -सामाजिकरित्या मागासलेल्या जमातींमध्ये मदत शोधली. मांग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली.इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला.सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले.याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले!

विजापूरजवळ एका बौद्ध विहारामध्ये झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली.पुण्यात त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही.शेवटी पुण्याच्या सार्वजनिक काकांनी म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले उच्च न्यायालयात महादेव चिमाजी आपटे हे बचावाचे वकील होते.फाशीची शिक्षा टाळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली.फडक्यांना आफ्रीकेतील येमेनच्या एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले.तुरुंगात मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध वासुदेव बळवंत फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा फेब्रुवारी १७,इ.स. १८८३ रोजी मृत्यू झाला.

पुढची गोष्ट
राजकारण४४४ दिवस ५२ अमेरिकन नागरिक इराणच्या कैदेत: अमेरिकेच्या अगतिकतेची गोष्ट४ नोव्हेंबर १९७९ रोजी इराणमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला झाला आणि ५२ नागरिकांना ४४४ दिवस ओलीस ठेवण्यात आले. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तब्बल १४ महिने वाट पाहावी लागली. या थरारक संघर्षाची आणि अमेरिकेच्या अगतिकतेची ही गोष्ट.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

१९७१ च्या भीषण दुष्काळात अकलूजमध्ये घातलेलं ते वादग्रस्त 'लक्षभोजन'
राजकारण

१९७१ च्या भीषण दुष्काळात अकलूजमध्ये घातलेलं ते वादग्रस्त 'लक्षभोजन'

१९७१-७२ सालच्या भयंकर दुष्काळात संपूर्ण महाराष्ट्र भुकेने व्याकुळ असताना अकलूजच्या एका नेत्याने मुलाच्या लग्नात 'लक्षभोजनाचा' घाट घातला. पाहुण्यांना थंडगार पाणी मिळावे म्हणून विहिरीत बर्फाच्या लाद्या टाकल्याचेही उल्लेख या इतिहासात वाचायला मिळतात.

३१ ऑक्टोबर, २०२६

सृजनमित्र २०२६: बोभाटाचा दिवाळी अंक. यंत्रांनी लिहिलेला मराठी अंक. ते चांगलं लिहू शकतं का?
लाइफस्टाइल

'माणूस खोटं बोलतो, मीटर बोलत नाही' हे वाक्य माणसाने लिहिलेलंच नाही!

बोभाटाच्या दिवाळी अंकातल्या २१ रचना पाच यंत्रांनी लिहिल्या आहेत. जमलंय की नाही, ते तुम्ही ठरवायचं.

५ नोव्हेंबर, २०२६

लाखो अपंगांच्या आयुष्याला गती देणारा संशोधक-जॉर्ज क्लाईन
विज्ञान

लाखो अपंगांच्या आयुष्याला गती देणारा संशोधक-जॉर्ज क्लाईन

जॉर्ज क्लाईन यांची मोटराइज्ड व्हीलचेअर ही एक क्रांतिकारी निर्मिती होती. या शोधामुळे हजारो-लाखो माणसांना स्वतःच्या इच्छेने जगात फिरण्याचे स्वातंत्र्य मिळाले.

४ नोव्हेंबर, २०२६

फटाके: काही धडाम, काही फक्त चमचम; रंग कुठून येतात आणि स्टील वूल का पेटतं?
विज्ञान

फटाके: काही धडाम, काही फक्त चमचम; रंग कुठून येतात आणि स्टील वूल का पेटतं?

फुलबाजी शांत आणि सुतळी बॉम्ब धडाम का? फटाक्यांचे रंग कुठून येतात, ग्रीन फटाके म्हणजे काय, आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारं स्टील वूल का पेटतं: दिवाळीच्या फटाक्यांमागचं सोपं विज्ञान.

४ नोव्हेंबर, २०२६