मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

बँक घोटाळे नेमके कसे होतात? एका सत्य घटनेमागची चक्रावून टाकणारी कहाणी!

4 मिनिट वाचन

बँकांमधील करोडो रुपयांचे घोटाळे नेमके कसे घडतात आणि तपासात काय समोर येते, याचा उलगडा करणारी ही रंजक कहाणी.

शेअर करा:
बँक घोटाळे नेमके कसे होतात? एका सत्य घटनेमागची चक्रावून टाकणारी कहाणी!

काही वर्षांपूर्वीची गोष्ट.म्हाडाचे बारा कोटी रुपये ठाण्याच्या एका राष्ट्रीय बँकेतून नाहीसे झाले.तीन महिन्यानंतर सहा जणांना अटक करण्यात पोलीसांना यश आले.रिकव्हरी फक्त रुपये साडेचार कोटी.

चेंबूरच्या एका खाजगी बँकेत आलेले तीन कोटी (अनिवासी) भारतीयाचे डिपॉजीट महासमता को.ऑप. बँकेत गेले आणि नाहीसे झाले.खाजगी बँकेच्या मॅनेजर सह सगळ्यांना अटक.रिकव्हरी काही लाखात.

एका फेमस कंपनीने वर्ल्डकपच्या मोसमात एक सवलत दिली.भारतीय संघ किती चौकार ,षटकार मारेल याचा अचूक अंदाज करा.किंमतीत भरघोस सवलत घ्या.कोट्यावधी रुपयांचे ड्राफ्ट जमा झाले. त्यातले जवळ जवळ दिड कोटींचे ड्राफ्ट नाहिसे झाले.चौदा जणांच्या चौकशीनंतर चार जणांना अटक.रिकव्हरी शून्य.

या सगळ्या बातम्या वाचनात येतातंच असं नाही.पण जेव्हा येतात तेव्हा एकच प्रश्न मनात येतो. हे असं होतंच कसं? संगणकीकृत शाखा आहेत,अंतर्गत लेखापरीक्षा आहेत, अनेक वर्षं काम करणारी माणसं आहेत,मग हे होतं तरी कसं? पोलीसांचं म्हणणं ठाम असतं आतून मदत असल्याशिवाय हे गुन्हे होत नाहीत.व्यवस्थित पगार, सुरक्षीत नोकरी, पेन्शन , असल्यावर कोण बरं हा धोका पत्करेल? पण,गुन्हे घडतात हे तर खरंच आहे.
वरवर पाहता बँकेच्या कामाची विण घट्ट दिसते पण काम करणारी माणसंच आहेत. व्याज,कर्ज,लोभ , व्यसनं, मानसिक दुबळेपणा, अगतीकता, लाचारी, आळस, बेफिकीरी, इथे पण आहेच.वर दिलेली सर्व उदाहरणं मोठ्या घोटाळ्याची आहेत.
छोटे घोटाळे होण्यासाठी आपणसुद्धा थोडासा हातभार लावतोच. चेकबुकच्या मागे चेक दिल्याची नोंद करण्याची व्यवस्था असते.कितीजण ती पूर्ण करतात.? रोख पैसे घेताना सगळेच जण पैसे मोजून घेतातं .नवे चेकबुक घेतल्यानंतर कितीजण चेक मोजून घेतात.?आता साहजिक प्रश्न असा आहे की कोरे चेक कशाला मोजायचे? हा एक कॉमन फ्रॉड आहे. चेक मोजले जात नाहीत.एक चेक आधीच काढला जातो.
दुसर्‍या चेकबुकची मागणी येइपर्यंत तो वापरला जात नाही.सहा सात महिन्यानंतर एक न समजणारी एंट्री पासबुकात येते. मग चौकशी. गोंधळ. कही बँका दाद घेतात,काही तुमच्या डोक्यावर खापर फोडून मोकळ्या होतात.

अनिवासी भारतीय या फ्रॉड चे लाडके ग्राहक. कारण फार सोपं आहे. यांचं पासबुक फार कमी वेळा नियमीत करण्यासाठी बँकेत येतं. फ्रॉड चा पत्ता लागेपर्यंत सहा महिने निघून गेलेले असतात.असो. पीसी-जेसीची कथा वाचण्यापूर्वी हे वाचल्यावर कथा समजणे सोपे जाईल.
आता प्रश्न असा आहे की मोठे गुन्हे कसे होतात? मोठे गुन्हे फक्त व्यावसायिक गुन्हेगार करतात.आतून मदत करणारे बळी जातात.पैसे कापरासारखे उडून जातात परत न येण्यासाठी.कनायवन्स असलेल्या गुन्ह्याचा छडा लावणं तसं सोपं जातं. हुशार अधिकारी पगार पावत्या अणि रजेच्या नोंदी आधी बघतात.कर्जाच्या रेट्याखाली कितीजण आहेत याचा तपास केला जातो. जुगार आणि दारु चे व्यसन असणार्‍यांची यादी बनवली जाते.अचानक झकपक खर्च करणार्‍यांवर नजर ठेवली जाते.माहिती देणार्‍यांना अभय मिळण्याची ग्वाही द्यावी लागते. तपास अधिकार्‍याचे काम सोपे होते. पण ......आतून मदत न घेता गुन्हा घडला तर तपास काम एका वळणानंतर थांबून जातं.

आता वाचू या पीसी जेसी ॲण्ड आऊट ही सत्यकथा !!
काही वर्षापूर्वी इब्राहिम मुल्ला या सॉलीसिटर फर्म ने कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्यांच्या अशीलाचे एस्क्रो अकाउंटचे पैसे सुमारे साठ लाख अफरातफर होउन गहाळ झाले आहेत.नेहेमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी पैसे बॅंकेत एफ.डी.मध्ये गुंतवले होते.त्याच्याकडे ज्या पावत्या होत्या त्या खोट्या आहेत असा बँकेचा दावा होता.तो खरा होता. पण चेक तर जमा झाला होता. तपासाअंती दहा लाख बँकेत बी. पी. जोशी यांच्या खात्यात जमा होउन काढून घेतलेले पोलीसांच्या निदर्शनास आले.बाकी पन्नास लाख भाईदरच्या बॅकेत जमा होउन काढून घेतलेले आढळून आले. पोलीसांनी तपासांती पाच आरोपींचा पत्ता लावला.जोशी, मेहेता , मिश्रा याना अटक करण्यात आली . तपास काम जसजसे पुढे गेले तसतसे गहीरे होत गेले . त्या तपासाची ही कहाणी.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

पीसी जेसी ॲण्ड आऊट: मनोरमा शेट्टी नावाच्या पात्राचा कागदोपत्री जन्म!
लाइफस्टाइल

पीसी जेसी ॲण्ड आऊट: मनोरमा शेट्टी नावाच्या पात्राचा कागदोपत्री जन्म!

बँक खाती उघडण्यासाठी नेटवर्क मार्केटिंगच्या आडून कागदपत्रे गोळा करणे आणि मनोरमा शेट्टीच्या बनावट खात्याची उभारणी.

६ ऑगस्ट, २०२६