मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पीसी जेसी ॲण्ड आऊट: घोटाळ्याची प्यादी आणि विनीताची नवी ओळख!

4 मिनिट वाचन

बँक घोटाळा यशस्वी करण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि पात्रांची जमवाजमव कशी केली गेली, याचा रंजक उलगडा.

शेअर करा:
पीसी जेसी ॲण्ड आऊट: घोटाळ्याची प्यादी आणि विनीताची नवी ओळख!

पीसी जेसी ॲण्ड आऊट-एका बॅंक घोटाळ्याची सत्यकथा आपण सध्या वाचत आहोत. आरोपी कस्टडीत जमा झालेत पण हा गुन्हा घडला कसा ? त्यासाठी काय काय पूर्वतयारी केली गेली ?बॅंक घोटाळा करायचा असेल तर एका मुख्य 'गेमर'च्या मागे इतर किती पात्रं काम करत असतात ? हे सगळं समजण्यासाठी काही भागात आपण 'फ्लॅशबॅक' तंत्राचा वापर करणार आहोत. चला तर, वाचू या पुढचा भाग

पंधरा दिवसांनंतर भाईंदरला पोहचता पोहचता साडेसात वाजले होते.स्टेशनच्या गर्दीतून वाट काढत काढत दिव्यप्रभा सोसायटीत येईतो आठ वाजले.फ्लॅट नम्बर ३१५ वरचे नाव वाचून घेतले.विनीता अशोक परमार.बेल दाबली.विनीतानीच दार उघडलं.विनीता माझं जुनं फाइंड.अशोक दम्याचा रोगी.दहा पावलं टाकली की धापा टाकायला लागतो.विनीतावर जबाबदारी पडली.ब्यूटी पार्लरच्या लाईनमध्ये.रेड पडली.जामिन भरायला माणूस नाही.परळचा मोठा भाया माझ्याकडे आला.त्याची मावस बहीण.कुन्देर वकीलाला सांगून जामीन झाला.नंतर दोन वर्षं लागली ट्रेन व्हायला.मुळात दिसायला सुंदर,बांधा घसघशीत.आता भाषा पण सुधारली.

मी आत गेलो.

"पानी?" "नको." "चाय?" " बादमे" सुरुवातीचे चार प्रश्न संपले आणि मी म्हटलं

"कामकी बात पहेले ध्यान से सून, अशोक क्यां छे?"

"बारे गयो छे." विनीता म्हणाली.

मी वेस्ट साईडच्या दोन पिशव्या पुढे टाकल्या.त्यात एक

.पटकन उठून ती आत गेली. पाच मिनीटानी बाहेर आली.थोडासा मेकप करून.कपडे हवे तस्से फिट्ट बसले होते. माझ्यासमोरून दोनदा कॅट वॉक केल्यावर सुद्धा हवा तो ईफेक्ट येईना.

"एक काम कर . काढ तो टी शर्ट." ती परत आत गेली.दार अर्धवट उघडून टी शर्ट फेकला.

"एक काम कर . तुझं नेल कटर दे."

दोन मिनीटानी मी परत टी शर्ट आत फेकला.

विनीता बाहेर आली. "काय केलं या शर्टला"

"काय झालं? फिटींग ठिक आहे ना?"

"हो. पण हे पहा खालून ओढला तर बटन निसटतंय"

"मग काय झालं?"

"काय झालं काय? आणि मग ती हसायला लागली.

"मी नेलकटरनी काज ढिला केलाय"

मग परत एकदा रिहर्सल.

शर्ट ओढला की बटन काज सोडायचं.परफेक्ट क्लिव्हेज.

"तुझ्याकडे पुश-अप ब्रा आहे? "

"हो. सिल्वर कलरची."

"आपल्याला स्टेज शो नाही करायचा आहे"

"ही घे .३६-बी" काळी. आता हवा तसा ईफेक्ट आला.

"गुड.आता बस आणि सिन -शॉट ऐक."

नंतर तासभर मी बोलत होतो. ती समजून घेत होती.

"मेक-अप परफेक्ट पाहिजे. परफ्युम मी सांगतो तोच"

"कामाअगोदर तीन दिवस फेशिअल. मॅनीक्युअर, पेडीक्युअर. नविन पर्स. बिझीनेस कार्ड. मोबाईल.पेन्सील हील्स."

"हे पंधरा हजार .ओके."

तासाभरानंतर मी बाहेर पडलो.उद्या गणेश टॉकीज मुलुंड.पण अगोदर परळ ला मोठ्या भायाला भेटायचं.दुसरी सोंगटी कटेवर .

सात दिवसानंतर..... "सर गुड मॉर्नींग , मै शैलजा, सिटी बँक की ओर से बात कर रही हूं."

मी सक्काळपासून अशाच कॉलची वाट पहात होतो.

"बोलो मॅडम , हमारी बँक आपको क्रेडीट कार्ड ऑफर कर रही है."

"आगे बोलो. मै सून रहा हू.................."

"तो फिर मै बंदेको किधर भेजू?

" ऐसा करो. मै पाच बजे स्वामीनारायण मंदीर के पिछे दादर क्लब है.वहां पे भेजो.

"ठीक है सर."

सहा वाजता सिटीचा डॉकबॉय आला.

"बस रे बाबा"

"सर , डॉक्युमेंट."

"हो राजा देतो ना?"

"एजन्सी कुठली रे तुझी? घे. कोक पी"

"पिनाकल सर."

"पगार किती रे "

" धा हज्जार. आणि पंधरा रुपये एका पिक अपचे"

"कमी नाही पडत"

"पडतात ना" "तुम्ही देता का नोकरी "

"नाही रे बाबा"

"तुला एका डॉ़कचे पंधरा मिळतात ना? मी पण देतो. "

" उद्यापासून जी पण डॉक्युमेंट आणशील त्याची एक कॉपी मला द्यायची"

थोडे आढेवेढे घेतले पण तयार झाला.

"चौथ्या दिवशी मनोरमा शेट्टीची डॉक्युमेंट आली."

तिसरी सोंगटी फीट.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

पीसी जेसी ॲण्ड आऊट: मनोरमा शेट्टी नावाच्या पात्राचा कागदोपत्री जन्म!
लाइफस्टाइल

पीसी जेसी ॲण्ड आऊट: मनोरमा शेट्टी नावाच्या पात्राचा कागदोपत्री जन्म!

बँक खाती उघडण्यासाठी नेटवर्क मार्केटिंगच्या आडून कागदपत्रे गोळा करणे आणि मनोरमा शेट्टीच्या बनावट खात्याची उभारणी.

६ ऑगस्ट, २०२६