मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?

3 मिनिट वाचन

मेसोपोटेमियातील पहिल्या संग्रहालयापासून ते आजच्या आधुनिक म्युझियम्सपर्यंतचा रंजक प्रवास आणि त्याचे महत्त्व.

शेअर करा:
इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?

इसवी सन पूर्व ५३०.मेसोपोटेमियाच्या ऊर (Ur) शहरात राजकुमारी एनिगाल्डी-नान्ना एका दालनात प्राचीन वस्तूंची मांडणी करत होती. प्रत्येक वस्तूशेजारी तिने मातीच्या विटांवर त्या वस्तूची माहिती लिहून ठेवली होती. हे जगातील पहिलं म्युझियम होतं. एका राजकुमारीच्या संग्रहातून सुरू झालेला हा प्रवास आज मानवी संस्कृतीचा आरसा बनला आहे.

'म्युझियम' हा शब्द ग्रीक शब्द 'माउझियन' (Mouseion) वरून आला आहे. याचा अर्थ 'कलांच्या देवतांचे मंदिर' असा होतो. सुरुवातीच्या काळात म्युझियम ही केवळ श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांची खासगी मालमत्ता होती. राजे-महाराजे आपल्या विजयाचे पुरावे आणि दुर्मिळ वस्तू एका खोलीत साठवून ठेवत. याला 'कॅबिनेट ऑफ क्युरिऑसिटीज' म्हटलं जायचं.

१६८३ मध्ये ऑक्सफर्डमधील 'ॲशमोलियन' हे सर्वसामान्यांसाठी खुलं झालेलं पहिलं सार्वजनिक म्युझियम ठरलं. तिथूनच हा वारसा खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचला. आज जगभरात सुमारे ९५,००० हून अधिक म्युझियम्स आहेत. हे केवळ जुन्या वस्तूंचे सांगाडे नाहीत, तर ते मानवी उत्क्रांतीचे जिवंत पुरावे आहेत.

आपल्या महाराष्ट्रातही राजा दिनकर केळकर म्युझियम किंवा मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय ही केवळ पर्यटन स्थळं नाहीत. ती आपल्या अस्मितेची केंद्रं आहेत. एखादी वस्तू जेव्हा म्युझियममध्ये जाते, तेव्हा ती केवळ 'वस्तू' उरत नाही. ती एका विशिष्ट काळाची आणि संस्कृतीची प्रतिनिधी बनते.

म्युझियमला भेट का द्यावी? यामागचं कारण साधं आहे. आपण कोण आहोत आणि इथवर कसे पोहोचलो, हे समजून घेण्यासाठी तिथे जाणं गरजेचं आहे. आजच्या डिजिटल युगात स्क्रीनवर फोटो पाहणं सोपं आहे. पण प्रत्यक्ष त्या हजारो वर्ष जुन्या वस्तूच्या समोर उभं राहून जो अनुभव येतो, तो गुगल सर्च कधीच देऊ शकत नाही.

म्युझियम हे एका 'टाईम मशीन'सारखं असतं. तिथे गेल्यावर आपल्याला आपल्या मर्यादा आणि पूर्वजांचं अफाट कर्तृत्व दोन्ही एकाच वेळी जाणवतं. हा अनुभव माणसाला अधिक प्रगल्भ आणि नम्र बनवतो.इतिहास विसरणारी माणसं भविष्य घडवू शकत नाहीत आणि म्युझियम आपल्याला तो इतिहास विसरू देत नाहीत.

बोभाटाच्या माध्यमातून आपण काही निवडक म्युझियमला भेट देऊ या.हे वाचून- पाहून कदाचित तुमच्या पुढच्या 'ट्रॅव्हल प्लॅनमध्ये नक्कीच एक म्युझियम असेल. चला तर आज भेट देऊ या इंडियन म्युझियम ऑफ कोलकताला

सन १८१४ मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या परिसरात भारतीय संग्रहालयाची (Indian Museum) स्थापना झाली. हे केवळ भारतीय उपखंडातीलच नव्हे, तर संपूर्ण आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वांत जुने आणि सर्वांत मोठे बहुउद्देशीय संग्रहालय मानले जाते.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

१७० वर्षांपूर्वीचा 'तो' कायदा आणि आजही सुरू असलेला लढा: विधवा विवाहाची क्रांती!
लाइफस्टाइल

१७० वर्षांपूर्वीचा 'तो' कायदा आणि आजही सुरू असलेला लढा: विधवा विवाहाची क्रांती!

ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या प्रयत्नांमुळे १८५६ मध्ये आलेला हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा आणि भारतीय स्त्रीच्या हक्कांचा सुरू असलेला संघर्ष.

१६ जुलै, २०२६

गुन्हेगाराचा 'साईड पोझ' फोटो का काढला जातो? ओळखा यामागचा इतिहास!
विज्ञान

गुन्हेगाराचा 'साईड पोझ' फोटो का काढला जातो? ओळखा यामागचा इतिहास!

गुन्हेगारांची अचूक ओळख पटवण्यासाठी मग शॉट आणि बाजूने फोटो काढण्याची 'बर्टिलन पद्धत' शोधणाऱ्या अल्फोन्से बर्टिलनची कहाणी.

११ जुलै, २०२६

तोंडातून धूर काढला म्हणून ७ वर्षं जेलची हवा; एका स्पॅनिश खलाशाची अजब गोष्ट!
लाइफस्टाइल

तोंडातून धूर काढला म्हणून ७ वर्षं जेलची हवा; एका स्पॅनिश खलाशाची अजब गोष्ट!

कोलंबससोबत प्रवास करून युरोपमध्ये पहिल्यांदा तंबाखू आणणाऱ्या रॉड्रिगोला तोंडातून धूर काढल्यामुळे चक्क ७ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

२३ जुलै, २०२६