आज १ ऑक्टोबर. आता आपण मोबाईल उचलतो. WhatsApp वर दोन ओळी टाइप करतो आणि काही सेकंदांत संदेश जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचतो.
पण एकेकाळी? संदेश पाठवण्यासाठी कागदावर अक्षरं उतरवावी लागत. त्या काळात निरक्षरांची संख्या मोठी असल्याने अनेकांना आपला संदेश दुसऱ्याकडून लिहून घ्यावा लागे. मग तो कागद लिफाफ्यात ठेवायचा. त्यावर पोस्टाला समजेल असा पत्ता लिहिणं हेही एक आव्हानच होतं.. आणि शेवटी तो लिफाफा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी पोस्टाचं तिकीट लावावं लागे.
भारतात या प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा आला ऑक्टोबर १८५४ मध्ये.
याच काळात भारतभर वापरता येणाऱ्या पहिल्या postage stamps ची विक्री सुरू झाली.
आणि त्या स्टॅंपवर चेहरा होता—राणी व्हिक्टोरियाचा.
अर्धा आणा, एक आणा, दोन आणे आणि चार आणे—अशा चार मूल्यांचे हे stamps होते. त्यांची रचना आणि छपाई कलकत्त्यात झाली. आज आपण पोश्टाचा स्टॅंप म्हटला म्हटलं की त्याच्या कडेवरची पर्फोरेशनची बारीक छिद्रं डोळ्यांसमोर येतातच पण या पहिल्या भारतीय स्टॅंपवर ती नव्हती. त्यांना पाठीमागे गोंदही लावलेला नसे.
म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर—अगदी ‘basic version’!
पण त्यांचं ऐतिहासिक महत्त्व मात्र विलक्षण होतं.
विशेष म्हणजे चार आण्यांचा stamp दोन रंगांचा होता. त्यामुळे जगातील सुरुवातीच्या दोन रंगाचा वापर करून छापलेल्या स्टॅंपमध्ये त्याला विशेष स्थान आहे..Philately—म्हणजे postage stamps चा अभ्यास आणि संग्रह—करणाऱ्यांसाठी हा मुद्दा आजही विशेष महत्त्वाचा आहे.
आणि मग आलं First Day Cover… स्टॅंपची गोष्ट इथेच संपत नाही.
फिलाटेलीमध्ये एक सुंदर संकल्पना आहे—First Day Cover, म्हणजे FDC.
नवीन स्टॅंप ज्या दिवशी अधिकृतपणे जारी होतो, त्याच दिवशी तो stamp एखाद्या लिफाफ्यावर लावला जातो आणि त्यावर त्या दिवसाची postal cancellation केली जाते. त्यामुळे तो लिफाफा त्या stampच्या ‘पहिल्या दिवसाची’ नोंद बनतो.
सुरुवातीच्या काळात संग्राहक स्वतः नवीन स्टॅंप घेऊन तो लिफाफ्यावर लावून पहिल्या दिवशी त्यावर कॅन्सलचा शिक्का मिळवत. पुढे या पद्धतीचं रूपांतर स्वतंत्र philatelic परंपरेत झालं. लिफाफ्यावर स्टॅंपच्यासोबत त्या विषयाशी संबंधित चित्र, मजकूर किंवा चिन्ह—ज्याला cachet म्हणतात—ते दिसू लागलं.
भारतामध्ये १९४०च्या दशकात अशा कव्हरची उदाहरणं दिसतात. १९४६च्या व्हिक्टरी इश्यूसाठीअनेक खाजगी First Day Covers तयार झाले होते. आणि इथे येतो आजच्या दिवसाशी जोडलेला एक सुंदर योगायोग.
१ ऑक्टोबर १९५४ रोजी भारताने आपल्या postage stampच्या शताब्दीनिमित्त ‘Indian Postage Stamp Centenary’ issue काढला. त्या निमित्ताने First Day Coverही जारी करण्यात आले.
म्हणजे १८५४ मध्ये सुरू झालेल्या postage stampच्या प्रवासाची शंभर वर्षांनंतरची आठवणही एका लिफाफ्यावर जतन झाली.
किती सुंदर कल्पना आहे ना?
एखाद्या stampचा पहिला दिवस स्वतः एका coverमध्ये बंद करून ठेवायचा!
आणि आता खरी गंमत…
१८५४ मध्ये ज्याची किंमत फक्त अर्धा आणा होती, त्याच stampची आज किंमत किती असू शकते?
उत्तर आहे—काही हजार रुपयांपासून हजारो पौंडांपर्यंत!
कारण जुन्या stampची किंमत त्यावर छापलेल्या किमतीने ठरत नाही. तो किती दुर्मिळ आहे, कोणत्या printing varietyचा आहे, त्याची अवस्था कशी आहे, cancellation आहे की नाही, margins कसे आहेत आणि त्याचा provenance किती विश्वासार्ह आहे—या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
एखादा साधा used stamp काही हजार रुपयांत मिळू शकतो; तर एखादा दुर्मिळलाखो रुपयांपर्यंत जाऊ शकतो.थोडक्यात, कालचा अर्ध्या आण्याचा कागद आज ‘antique asset’ बनू शकतो!
पण या stampची खरी किंमत फक्त पैशांत मोजणं थोडं अन्यायकारकच ठरेल. कारण तो केवळ कागदाचा तुकडा नव्हता.
तो भारतात बदलत असलेल्या जगाचा एक छोटासा पुरावा होता.
रेल्वेचं जाळं विस्तारत होतं. व्यापार वाढत होता. टपाल व्यवस्था बदलत होती. व्यापारी, अधिकारी, सैनिक, कुटुंबं—सगळ्यांनाच दूरवर संवाद साधण्याची गरज वाढत होती.
आणि त्या संवादावर बसलेला हा छोटासा रंगीत तुकडा जणू सांगत होता—
‘तुमचं पत्र इथून निघालं आहे. आता ते तुमच्यापासून कितीही दूर जाऊ शकतं.’
आज WhatsApp वर ‘Sent’ दिसतं.
१८५४ मध्ये मात्र त्या संदेशाच्या प्रवासासाठी राणी व्हिक्टोरियाचा चेहरा असलेला हा छोटासा कागद लावावा लागत होता!
आणि आज First Day Coverच्या संग्रहात एखादा जुना लिफाफा हातात घेतला, तर त्यावरचा stamp, त्याची cancellation आणि तारीख मिळून आपल्याला त्या काळात घेऊन जातात.
एक stamp.
एक लिफाफा.
एक तारीख.
आणि त्यात बंदिस्त झालेला एक दिवसाचा इतिहास.
काळ बदलला.माध्यम बदललं. संदेश पाठवण्याची पद्धत बदलली.त्याची किंमतही बदलली.
पण माणसाची एक गरज अजूनही तशीच आहे—
आपल्यापासून दूर असलेल्या माणसापर्यंत काहीतरी पोहोचवण्याची.






