मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पीसी जेसी ॲण्ड आऊट: जेलमधील सकाळ आणि सेटलमेंटचा खेळ!

5 मिनिट वाचन

पोलीस लॉकअपमधील रात्र, सहकारी बँकांचे काळे धंदे आणि आरोपीला वाचवण्यासाठी सुरू असलेला लाखांचा खेळ.

शेअर करा:
पीसी जेसी ॲण्ड आऊट: जेलमधील सकाळ आणि सेटलमेंटचा खेळ!

पीसी जेसी ॲण्ड आऊट-एका बॅंक घोटाळ्याची सत्यकथा

(या आधीच्या भागाचा शेवट: मी फक्त दहा लाखाच चेक ईब्राहीम मुल्ला मधून उडवला होता. गेमप्लॅन तसा होता.पण तक्रार आणखी साठ लाखाची होती. हे साठ लाख कुणी उडवले? मी नाही. मग कोण? एक भयानक शंका माझ्या मनात आली. माझ्या पटावर एक आणखी नवा अनाहूत खेळाडू होता. चोरावर मोर?)

(आता वाचू या पुढचा भाग)

रात्रभर अंग ठणकत होतं.मिश्रा माझ्या पायगती बसून होता.डोक्यामधे आलेला विचार झोप लागू देत नव्हता.आपली पकड निसटत तर नाही ना असा विचारही येत होता.आता पुढचे सात दिवस महत्वाचे होते.मेहेताचा धीर सुटता कामा नये.मला मेहेताची बाजू पक्की ठेवायची होती.

मिश्राची काळजी नव्हती.जुना पक्का बाजीगर खेळाडू होता.मिश्रा माझा कटर होता.कमीतकमी दहा बारा सहकारी बँकेत त्याची सेटींग होती.त्याला चेक दिला की अकांउट न उघडता एन्कॅश करून रोकड पोच व्हायची.टीपी (थर्ड पार्टी) करणार्‍या बँका फक्त सहकारी बॅंका असतात.चेक कुणाच्याही नावावर असू देत पास होतात ते एकाच खात्यातून.सहकारी बँकाना धंदा हवा असतो. डायरेक्टर अर्धशिक्षीत असतात.टीपी करणारा धंदेवाईक असला तर धोका नसतो. काळबादेवीतल्या शंभर दिडशे मारवाड्यांचा धंदा या बँकांच्या जिवावर चालतो.

अधून मधून एखादी बँक बुडते.चार दिवस गाजावाजा होतो. मिरा-भायंदर को.ऑप.बॅंक , रवीकिरण को.ऑप. अशाच बुडत गेल्या. चार वाजले .मिश्रा माझ्या पायाशी झोपला होता.मेहेता घोरत होता. बाकी बराकीतून आवाज बंद झाले होते.माझ्या डोळ्यावर झोप कोसळली.मी सकाळी जागा झालो तेव्हा सात साडेसात वाजले असावेत.

भसाड्या आवाजात कोणीतरी गात होतं. मी जागा झालो. एक पंजाबी मध्यमवयीन माणूस भजन करत होता.दुसर्‍या कोपर्‍यात एक पांढरा शुभ्र लेंगाझब्बा घातलेला माणूस नमाज करत होता.मेहेता फेर्‍या मारत होता.अर्धवट दाढी वाढलेला एक इसम कोपर्‍यात गप्प बसलेला होता.मी जागा झाल्याचे पाहून मिश्रा पुढे झाला.हातावर चिमूटभर मिठ ठेवून म्हणाला "आज इससे चला लेना. बाहर निकालेंगे तब सबकुछ सेट करेंगे."

मिठानी दात घासून तोंडावर पाणी मारून मी फ्रेश झालो. मिश्रानी टाळी वाजवून कोपर्‍यात बसलेल्या माणसाला ऑर्डर दिली. " ओ, उठ बे, संडास साफ कर,जल्दी." माणूस पटकन उठला. बराच वेळानी बाहेर आला." हो गया मिश्रा साब. " मी संडासला गेलो. लॉक अप च्या संडासाला दरवाजे नसतातच.टमरेलाच्या जागी पाण्याची बाटली अर्धी कापून ठेवलेली होती.बाजूला बाथरूम होती.आंघोळ करून तेच कपडे घालणं भाग होतं.सगळं आटपून बाहेर आलो तेव्हा साडेआठ वाजले होते.

अकराचे कोर्ट म्हणजे दहाच्या आधी बाहेर काढणार नाहीत. चहा वगैरेचा प्रश्न नव्हताच. नऊ वाजता भत्ता भत्ता म्हणजे उसळीचे पाणी आणि दोन पाव. मला चहा भत्त्ता नको होता.माझे पाव मेहेतानी खाउन टाकले.

आता वेळ झाली होती हिशोबाची.मी,मेहेता,मिश्रा कोंडाळं करून समोरासमोर बसलो.

"बोल मेहेता,तेरा क्या?" मी पहिला प्रश्न टाकला.

"मेरा वकील आयेगा.बेल हो जायेगा." मेहेता म्हणाला

"भूल जा.तेरा सात दिन का रीमांड होनेवाला है."मिश्रानी ओव्हरचा पहिला बॉल टाकला.

मै पोंडा को लाया है." मेहेतानी डिफेन्स केला.

"पोंडा आने दे नही तो गेंडा .रिमांड पक्का.विरकर सात दिन पिटनेवाला है तेरेको." मिश्रा म्हणाला

मेहेताचा चेहेरा पडला.त्यानी माझ्याकडे पाह्यलं.मी होकारार्थी मान हलवली.आता त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

" मैने कुछ नही किया फिरभी."

"हां. फिर भी."

आता मी प्रश्न विचारायला सुरुवात केली.

"मेत्ता ,एक बात बता तूने कुछ नही किया,तो तेरी इतनी क्यू फटी पडी है.सिधीसी बात समझ ले. तेरेको बचना है पिटाईसे तो रास्ता निकलेगा" "लेकीन हम लोग क्यू बचायेंगे तेरेको.वैसे कलतक तेरेको बचाया है .माधुरी सब सम्हाल लेगी."

"बापू, इसका सबका रुपया लगता है,वो कहासे आयेगा,विरकर को मालूम पडेगा की माधुरी..... "

मेहेतानी गळाच काढला.फारशी वाट न बघता मिश्रानी मेहेताचे केस धरून त्याची मुंडी वर केली आणि कानाखाली वाजवली. "स्साला ,रोता है. पिटाईसे डरता है. भोसडीके,अभी तो आर्थर रोड बाकी है."

" मेरे भाई चल बता दे तेरी ष्टोरी. फिर हम गाना लिखेंगे." मिश्रा फॉर्मात आला.

हाफ चड्डीतला मेहेता फारच गमतीदार दिसायला लागला होता.

रडत,भेकत त्यानी जे सांगीतलं ते फारच गमतीदार प्रकरण होतं. मेहेता आणि त्याचा भाऊ एकाच सर्टीफीकेट वर कामाला लागले होते. दोन भाऊ ,एक सर्टीफीकेट.एक मुंबईत तर दुसरा सूरत मध्ये.हा खरा सुरेन्द्र मेहेता.

दुसरी महत्वाची पिडा, मेहेता जुगारी होता.ट्र्स्टची डीपॉजीट आणून नल्ला सर्टीफिकेट इश्यु केली होती.माझी गेम दहा लाखाची तर मेहेताची दिड करोडची.आता फ्रॉड झाला म्हणजे ऑडीट येणार.

मेहेता परत रडायला लागला.मी थोडा विचार करून मेहेताला सांगीतलं.

"देखो मेहेता, तू बचेगा. मैने माधुरी को तेरे साथ रखा है. कोई नही जानता माधुरी तेरी बहन नही है.तू तीन दिन के बाद हॉस्पीटलमे जमा हो जा."

"अब ये बता ,नोट किधर है?नोट दिखा जान बचा ले"

"हा,एक बात और विरकर के साथ मिलके डबल ढोलकी बजा और फिर.....

मेहेतानी पाय पकडले. "

"नही मालीक हूं रुपया आप्पीस. चोक्कस. पण हिसाबथी...

हां- ना करता करता मेहेताला वाचवायचे २० लाख ठरले.

दिवसाची सुरुवात चांगली झाली होती.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

बँक घोटाळे नेमके कसे होतात? एका सत्य घटनेमागची चक्रावून टाकणारी कहाणी!
लाइफस्टाइल

बँक घोटाळे नेमके कसे होतात? एका सत्य घटनेमागची चक्रावून टाकणारी कहाणी!

बँकांमधील करोडो रुपयांचे घोटाळे नेमके कसे घडतात आणि तपासात काय समोर येते, याचा उलगडा करणारी ही रंजक कहाणी.

३० जुलै, २०२६