पीसी जेसी ॲण्ड आऊट-एका बॅंक घोटाळ्याची सत्यकथा
बारा जानेवारी २००२ ला संध्याकाळी साडेचार वाजता सरतेशेवटी मला अटक झाली.महिनाभर माझी आणि मेहता,मिश्रा यांची कसून चौकशी चालली होती.चार वाजता विरकर Additional CPला भेटून परत आले आणि आम्हाला बोलावलं. पहिला प्रश्न मेहेताला विचारला
"देखो मेहता तेरेको पैला चांस. एफडी रिसिट कौन बनाया?"
"मेरेकु नही मालूम. हू तो वरली मा छू"
मेहेताचे वाक्य संपायच्या आत मेहेताच्या दोन्ही कानाखाली आवाज.
दोन मिनिटं शांतता. टायपिस्ट मध्येच थांबले.मेन रोडच्या रहदारीचा आवाज.बाकीचे आयो बोलायचे थांबले.
दहा सेकंदानी मेहेताचा रडण्याचा आवाज.
अमावस्येला कुत्रं रडत तशा भेसूर आवाजात.
(जोशी साब अपना नंबर है आज.मिश्रा माझ्या कानात कुजबुजला.)
मेहेता परत विरकर च्या समोर बसला.
महाडीक वाटंच पहात होता. त्यानी मेहेताच्या पाठीत एक जोरात रट्टा हाणला.
मेहेता दोन टेबलाच्या गॅपमध्ये.
विरकरनी पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर ओतला.मेहेताचा आवाज अजून भेसूर झाला.तो परत उठून खुर्चीवर बसणार तेवढ्यात विरकरनी खुर्ची वर लाथ मारली आणि खेकसला "निचे बैठ गांडू".मेहेता जेमतेम त्या फटीत मावला.
विरकरनी एकदा कपाळावरचा घाम पुसला.महाडीकला सांगीतलं "पट्टा काढा महाडीक..." कपाटातून महाडीकनं पट्टा काढला.
("ये जीतना मार खायेगा उतना अपनेको कम पडेगा"मिश्रा पुन्हा एकदा माझ्या कानात कुजबुजला)
"इसकी भैन आयी क्या आज? विरकरनी विचारलं. कोणीतरी म्हणालं "नही साहेब"
"फिर रहेने दे .ती आल्यावर तिच्यासमोर मारतो साल्याला" विरकर म्हणाला.
"काय रावसाहेब,ऍडीशनलनी दिला काय आज बांबू?"समोरच्या टेबलवरून प्रधान साहेबांनी तेल घातलं.
खरं म्हणजे ही केस त्याला हवी होती पण विरकर स्वत:कडे केस मार्क करून घेण्यात हुशार.प्रधानला बार असोसिएशनची भुक्कड केस मिळाली होती.
बँक फ्रॉड मध्ये आरोपी गब्बर असतात .थर्ड डीग्री जास्त वापरावी लागत नाही.आरोपीपेक्षा नातेवाईकांवर प्रेशर घालायचं असतं.चारी बाजूनी कमाई.जोडीला एखादी नवी बाईपण मिळून जाते..पण त्यासाठी आर्थिक घोटाळे समजण्याची अक्कल पाहिजे.आणि अफरातफरीचे नेहेमीचे यशस्वी कलाकार माहिती हवेत
गणित साधंसोप असतंय.दोन तीन कारकूनांना मॅनेजर सोबत घेउन यायचं. त्यातल्यात्यात नाजूक जो दिसेल त्याला आधी फटकवायचा.मॅनेजरवर चार चौघात चढायचं.सगळ्यांना सहा सात तास बसवून ठेवायचं.घरून मोबाइलवर फोन यायला सुरुवात झाली कि फोन हिसकून आपणंच बोलायंच.तोपर्यंत सगळ्यांना मुतायला लागते.
दुसर्या दिवशी बँकेच्या दोन बायकांना पंधरा विस मिनीटं या शो मध्ये बोलवायचं.तिसर्या दिवशी पासून कमाई चालू !
पांढरपेशा समाजातले लोक वकीलाला घेऊन येत नाहीत.कमीपणा समजतात.अडाणी आरोपीचा वकील त्याच्या आधी पोलिस स्टेशनला येउन सेटींग लावतो.टॅरीफ ठरलेलं असतंय.
महिन्याभराच्या सरावामुळे माझ्या घरून कोणी नाही आलं तरी चालणार होतं.
माणसांची गरज अटक झाल्यावर लागते.आत केलेला पैसा तेव्हा कामाला येतो.थर्ड डीग्री पडत नाही.आत केलेला माल पचवता येतो. थोडीशी रिकव्हरी द्यावी लागते पण ठीकच आहे.सिनीयर पासून सगळ्यांना बघाव लागतं .वो भी ठिक है. पुढच्या मॅटरचा इन्शुरन्स प्रिमीयम भरला असं म्हणायचं .आयो ची बदली झाली की आणखी एक एरिया आपला. महिन्याभराच्या काळात सगळ्या युनीटची नाव माझी पाठ झाली होती
"त्या भय्याला घे रे आत"
मेरा नंबर लगा जोशीसाब मिश्रा म्हणाला.
मिश्रा उठला.हात जोडून विरकर समोर उभा राहिला.
थोबाडीत मारायची तर त्यांना जागेवरून उठावं लागेल असा उभा राहिला.
"तू कल रात घर गया था?" पहिला प्रश्न.
"हां साब" मिश्रा म्हणाला.
"भोसडीके किधर सोया था?"
"साब दहिसर गया था."
"कौन से बार मे....'
"इस टेन्शन में क्या घर और क्या बार साब". मिश्रा पुटपुटला.
खरं म्हणजे मॅटर फुटल्यानंतर मिश्रा घरी गेलाचं नव्हता.
विरकर जागचा उठला.मिश्रा दोन पावलं मागे सरकला.महाडीक मागे उभाचं होता.त्यानी मिश्राला पुढे ढकललं.मिश्रा विरकरच्या टप्प्यात आला. फाड्कन आवाज आला.मिश्रा भुईसपाट.ओठ फाटला. रक्त गळायला लागलं.बाहीला रक्त पुसत परत हात जोडून उभा राहीला.
"आयझवाड्याचा चा बाप आज *हेबिअस कॉर्पस फाइल करून आला... ऍडीशनल सिपि चढला माझ्यावर आज"
आता विरकर कळवळायला लागला.
"खूप झालं जमा करा भडव्यांना"
इतका वेळ माझ्याकडे लक्ष नसलेलं आता पूर्ण माझ्याकडे फोकस झालं होतं.
"भटा,तुझी आज वाजवतो".
मी काहीचं बोललो नाही. फक्त नाक दाबून उभा राहीलो. मिश्रा बाजूला उकिडवा बसला होता. तोही उभा राहीला. त्यानी मेहेताकडे बोट दाखवलं.मेहेता मुताचा थारोळ्यात बसून होता.
पुढची दहा मिनीटं गतीमान हालचालीत गेली. थोरात मेहेताला बाथरूम मध्ये घेउन गेला.भयंकर ढगळ हाफ चड्डी घालून तो परत आला. माधुरी,मेहेताची बहिण ठेपला ने चा घेउन आली.विरकर खूश होउन एसिपी साहेबांच्या केबीन मध्ये गेला. मेहेता आणि मिश्रा दोघांची ऍरेस्ट मेमो रायटर लिहायला सुरुवात केली.
मिश्रा माझ्या बाजूला येउन बसला होता. अचानक खूश होउन म्हणाला
"चलो जोशी साब मेरी छुट्टी शुरु.एक बार पीसी हो गयी तो समझो मॅटर खतम "..
"ये साला अब और नही मार सकता.दो दो दिन बाद मेडिकल लिखानी पडेगी. आपको लास्ट अंदर करेगा"
"मै मेरा दे देगा. लेकीन आप जादा ढिल नही देना सालेको"
"हां, माधुरी को बोलना आज नही,कल.
मला सगळं सम़जलं.आता फक्त पंधरा दिवस.मी परत एकदा हसलो.विरकर समोर उभा होता.
(पुढील भाग उद्या संध्याकाळी चार वाजता वाचता येईल)
____
काही महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ
*Additional CP - पोलीस कमिशनर जो सिनियर म्हणजे Deputy Inspector General (DIG)च्या बरोबरीचा समजला जातो.
*थर्ड डीग्री - मारहाण , चोपून काढणे
*हेबिअस कॉर्पस-हा व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करणारा एक महत्त्वाचा कायदेशीर उपाय (रिट) आहे. Habeas Corpus हा लॅटिन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ "त्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करा" किंवा "तुमच्याकडे ती व्यक्ती आहे" असा होतो.या रिटद्वारे न्यायालय संबंधित अधिकाऱ्याला किंवा कारागृह प्रशासनाला अटकेत ठेवलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश देते आणि त्या व्यक्तीची अटक किंवा नजरकैद कायद्यानुसार वैध आहे का, हे सिद्ध करण्यास सांगते. जर अटक बेकायदेशीर किंवा विनाकायदेशीर अधिकाराची असल्याचे आढळले, तर न्यायालय त्या व्यक्तीची तात्काळ सुटका करण्याचा आदेश देऊ शकते.






