वॉर्ड नंबर पाच, केईएम

काल मुंबईतल्या केईएम हॉस्पीटलबद्दल काही माहिती शोधता शोधता या हॉस्पीटलचे एक ज्येष्ठ सेवानिवृत्त शल्यचिकीत्सक डॉ.रवी बापट यांचे अनुभव कथन करणारे 'वॉर्ड नंबर पाच, केईएम' हे पुस्तक बोभाटाच्या संग्रहात सापडले.

रोहन प्रकाशनाच्या या पुस्तकात डॉक्टरसाहेबांचे अनेक वर्षांचे काही अत्यंत गंभीर तर काही मस्त मनोरंजक अनुभव वाचायला मिळाले.याच पुस्तकात खासदार शरद पवार यांच्या आयुष्यातील एका महत्वपूर्ण प्रसंगाविषयी लिहिले आहे ते वाचून मनन करण्यासारखे आहे.

डॉक्टर रवी बापट म्हणतात..

खरं तर ही शरदरावांच्या जीवनातील अत्यंत खाजगी बाब आहे;पण त्यामागे त्यांचा अत्यंत प्रगल्भ, प्रौढ आणि प्रागतिक विचार दडलेला आहे ज्याच्याबद्दल मला मनापासून आदर आहे.एक दिवस डॉ शशी बापट माझ्याकडे आला अन् म्हणाला," बघ रे बाबा, शरद म्हणतो की मला एकच मुलगी पुरे.मला जर राजकारण करायचं असेल आणि तेही व्यावसायिक दृष्टीकोनातून करायचं असेल तर मला खूप संतती असणं काही योग्य वाटत नाही. मुलगा -मुलगी असा भेद मी मानत नाही,कुटुंब चालवायला मुलगाच हवा,असाही माझा आग्रह नाही . तेव्हा काय करायचं ?"

पुढे डॉ.रवी बापट म्हणतात..

मग मी व शशी दोघंही त्यांच्याकडे गेलो व दोघा पतिपत्नींशी सविस्तर बोललो.शस्त्रक्रिया कुठं कारायची,कधी करायची असा जेव्हा सवाल आला तेव्हा शशी पटकन म्हणाला " ही शस्त्रक्रिया काय घरीसुध्दा होऊ शकते. मग काय ?

स्टेरीलाइज्ड मटेरियल,उपकरणं वगैरे शस्त्रक्रियेची जय्यत तयारी करून मी त्यांच्या घरी पोहचलो.शशीनंच मला साह्य केलं आणि मग ती नसबंदीची शस्त्रक्रिया त्यांच्या घरातच केली.सर्व व्यवस्थित पार पडलं.पण शेवटी ते पडले शरद पवार ! ४८ तासात ते फिरतीवर निघाले देखील.

हे पुस्तक बोभाटाच्या वाचकांनी वाचायलाच हवे.

उपयुक्त लिंक https://rohanprakashan.com/product/ward-no-5-kem/

सबस्क्राईब करा

* indicates required