पब्जीमधली ही ५ ठिकाणं... इथं तुम्ही खऱ्या आयुष्यातही जाऊ शकता!!
पब्जीच्या अफाट लोकप्रियतेमागचं महत्वाचं कारण आहे या गेमचं वास्तव जगताशी असणारं साधर्म्य. खऱ्या जगातल्या अनेक गोष्टी या गेममध्ये तंतोतत उतरवल्या गेल्या आहेत आणि यामुळंच ही गेममध्ये आपण अगदी हरवून जातो. पब्जीमध्ये दिसणारी अनेक ठिकाणं ही खऱ्याखुऱ्या जगातही अस्तित्वात आहेत आणि अर्थातच तिथं तुम्ही भेटही देऊ शकता. Let's Go...
Sosnovka Bridge (Erangle)
पब्जीमध्ये Sosnovka आणि मुख्य आयलॅन्डला जोडणारा एक ब्रिज आहे, बऱ्याच वेळा हा ब्रीज गाड्यांनी ब्लॉक करून शत्रूंच्या गाड्या अडवल्या जातात. त्यामुळं भरपूर बळी आणि रसदही मिळते. या ब्रीजची रचना ही आपल्या पश्र्चिम बंगालमधल्या हावडा ब्रिजसारखी आहे. कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना हा ब्रिज जोडतो.
Ruins (Sanhok)
सॅनहोक मॅपमधल्या 'रूईन्स' या जागी एक भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या इथं अनेकदा मोठा थरार अनुभवायला मिळतो. खऱ्या जगातही असंच मंदिर तुम्ही पाहू शकता. या मंदिराचं नाव आहे Htukkanthein Temple. हे मंदिर पश्र्चिम मॅनमारमधल्या म्रॉक-यु शहरात आहे. ही वास्तु गढी आणि बौध्द मंदिर अशा दुहेरी पध्दतीनं बांधलेली आहे.
Mylta Power (Erangle)
पब्जीमधलं भरपूर रसद सापडणारं आणि तितकंच धोकादायक असं 'मिल्टा पॉवर' हे ठिकाणही २६ एप्रिल १९८६ रोजी युक्रेनमधल्या प्रिप्याट शहरात झालेल्या 'चेर्नोबिल' दुर्घटनेतल्या अणू उर्जा प्रकल्पाशी मिळतंजुळतं आहे. एका भकास आणि प्रवेश निर्बंधित न्युक्लिअर पॉवर प्लान्टजवळून फिरण्याचा अनुभव तुम्ही मिल्टा पॉवरमध्ये घेऊ शकता.
Bhan (Sanhok)
सॅनहोकमध्ये खेळ सुरू होण्याआधी आपण ज्या 'Spawn' आयलॅन्डवरती उतरतो आणि जिथे आपल्याला कॅन्डीज मिळतात, ते 'भान' नावाचं ठिकाणही थायलंडमधल्या एका खऱ्याखुऱ्या ठिकाणावरून घेतलं गेलंय. Sai Ngam Banyan Grove नावाचं हे ठिकाण प्रसिध्द पर्यटन क्षेत्र आहे.
School (Erangle)
इरॅन्गल मॅप लावल्यावर तुमच्यातले अनेकजण 'स्कूल'च्या छतावर उड्या मारत असणार. ही जागा स्नायपर्ससाठी उपयुक्त ठरते. पब्जीमध्ये लागोलाग असलेल्या 'स्कूल'च्या ज्या दोन इमारती आपल्याला दिसतात, त्यांपैकी बऱ्याच खिडक्या असणारी छोटी इमारत, त्यातला बास्केटबॉल कोर्ट आणि स्विमींग पूल... या सगळ्या गोष्टी १९८६ मध्ये घडलेल्या चेर्नोबील दुर्घटनेत बंद पडलेल्या एका शाळेवरून घेतल्या आहेत. ही शाळा युक्रेनमधल्या प्रिप्याट शहरात आहे.
गेम ऑफ थ्रोन्स पाहून लोक त्या-त्या ठिकाणांना भेटी देतात. आता पब्जी फॅन्सही या सगळ्या ठिकाणी नक्की जातील यात काही वाद नाही.
आणखी वाचा :
पब्जी भारतात बनला असता तर, या माणसाने केलेले चित्रण परफेक्ट आहे