कचऱ्यापासून कमावले कोट्यावधी रुपये....आदिदासने नेमकं काय केलंय बघा !!
मंडळी, प्रदूषण रोखण्यासाठी बड्या कंपन्या पुढे आलेल्या काही वर्षापासून दिसत आहे. या कंपन्यांपैकी एक म्हणजे आदिदास. त्यांनी चक्क समुद्रात आढळणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापासून शूज तयार करण्याची अनोखी कल्पना मांडली होती. ही कल्पना २०१६ पासून सत्यात देखील उतरली. आता बातमी अशी आहे की २०१७ सालात आदिदासने या प्रकारातील तब्बल १० लाख बुटांची विक्री केली आहे.
मंडळी, आदिदासने २ वर्षांपासून या बुटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. आदिदासच्या इतर प्रकरातील शूजच्या तुलनेने या शूजची विक्री कमी असली तरी लोकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद येत आहे हे महत्वाचं.
हे प्लास्टिक नक्की कसे वापरले जाते ?
शूजच्या निर्मितीत वेगवेगळ्या गोष्टींसाठी लागणारे प्लास्टिक हे या कचऱ्यापासून मिळवले जाते. प्रत्येकी एक जोडी शूज मध्ये जवळजवळ ११ प्लास्टिक बॉटल्सचा वापर केला जातो. समुद्रातील ९५ टक्के प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचं आदिदासने सांगितलं आहे.
आदिदासने शूज तयार करण्याबरोबरच काही फुटबॉल संघांशी हातमिळवणी केली आणि या संघांकडून वापरण्यात येणाऱ्या गोष्टी याच प्रकारच्या प्लास्टिकपासून तयार केल्या.
आदिदास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे २०१८ सालात तब्बल ५० लाख शूज बनवण्याची त्यांची योजना आहे. हे झालं आजचं पण त्यांचा मुख्य टार्गेट २०२४ आहे. २०२४ पर्यंत त्यांना याच प्रकारच्या प्लास्टिकपासून त्यांचे सर्व उत्पादन तयार करायचे आहेत.
मंडळी, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल आहे.
आणखी वाचा :
प्लास्टिकच्या डस्टबीन बॅग्जवर पर्यावरणस्नेही उपाय...वाट कसली बघताय ? बनवा मग पटापट !!
हिमालयात प्लास्टिक बाटल्यांवर बंदी
खड्डेच खड्डे चोहीकडे...या उपायाने तरी रस्ते खड्डेमुक्त होतील का?