'२३० अब्ज डॉलर' संपत्ती असलेला हा होता भारतातील सर्वात श्रीमंत माणूस !!!
भारतातील सर्वात श्रीमंत मनुष्य कोण? तर मुकेश अंबानी हे नांव आपल्याला पाठ आहे.. पण भारताच्या इतिहासातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? तर ती आहे “मीर असद अली खान चिन चिलिच खान निजाम उल मुल्क आसफ जाह सप्तम”. हे गावाचं नाव नसून हे एकाच माणसाचं नाव आहे. थोडक्यात हैद्राबादचा शेवटचा निजाम ‘उस्मान अली खान’, सातवा असफजहॉं. जन्म ६ एप्रिल १८८६.
तर, हा निजाम भारताच्या इतिहासातला सर्वात श्रीमंत माणूस समजला जातो. त्याची एकूण संपत्ती तब्बल २३० अब्ज डॉलर इतकी होती. मुकेश अंबानी यांची संपत्ती केवळ ३० अब्ज आहे. म्हणजे २३०च्या पुढे किती शून्य असतील? असो. उस्मान अली खान यांच्या एकट्याच्या दागिन्यांची किंमत तब्बल १५ करोड डॉलर्स भरत होती. आता यावरून तुम्हाला त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज येईल. त्यांच्या महालात ६००० नोकर होते आणि फक्त झुंबरं साफ करण्यासाठी ३८ माणसं तैनात असायची. १९३७ साली टाईम मॅग्झीनने उस्मान अलीचा उल्लेख ‘Richest Man On Earth’ असा केला होता. त्यावेळी उस्मान अली यांचा फोटो मॅग्झीनच्या कवरवर झळकला होता. त्यात त्यांनी खालील शब्दात उस्मान अली यांच्या बद्दल माहिती दिली होती :
“Most news stories hung on the Richest Man are chiefly chatter about how careful His Exalted Highness is with his pennies — whereas $5,000 is his approximate daily income, his jewels have an estimated value of $150,000,000, he reputedly has salted down $250,000,000 in gold bars and his capital totals some $1,400,000,000, not to mention the fabled “Mines of Golconda. The cash Silver Jubilee gifts to the Nizam of Hyderabad, by his subjects were expected this week to total at least $1,000,000.”
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातली सगळी संस्थानं देशात् विलीन करण्यात आली पण हैद्राबादच्या उस्मान अली यांनी हैद्राबाद स्वतंत्र राहील म्हणून सांगितलं. त्यांनी विलीनीकरणाला साफ नकार दिला. पण भारतीय सैन्यापुढे शेवटी त्यांनी हार मानली आणि १९४८ साली हैद्राबाद भारतात सामील झालं. हैद्राबाद ताब्यात आल्यानंतर निजामाची सर्व संपत्ती सरकारने ताब्यात घेतली. संपत्ती जाण्याआधी उस्मान यांनी लंडनमधील ‘नॅचवेस्ट’ बँकेत 1 कोटी पाउंडचे हस्तांतरण नातू मुकर्रम जहॉं याच्या नावावर केलं होतं. पण त्याच्या दुर्दैवानं ते पैसे त्याला कधीच मिळू शकले नाहीत. ब्रिटीश सरकारनं त्या रकमेचे रुपांतर वॉर बॉंड (युद्धबंदी) मध्ये केलं आणि शेवटी फिक्स डीपॉझीटच्या रुपात सर्व पैसे ब्रिटीश तिजोरीत कायमचे बंद झाले. शेवटी त्या नातवाचं जीवन फार हलाखीत गेलं. उस्मान अली यांना ३४ मुलं आणि त्यांची १०४ चिल्लीपिल्ली म्हणजे नातवंड असल्यानं १९९० साली जवळजवळ ४०० लोकांनी उस्मान अलीच्या संपत्तीवर हक्क सांगितला होता.
स्रोत
श्रीमंत लोकांकडं आपल्या इथं थोडं वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. पण उस्मान अली यांच्या बाबतीत एक गोष्ट इथं आवर्जून सांगितली पाहिजे, ती म्हणजे त्यांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण, विज्ञान आणि विकासाला खूप महत्व दिलं. तसंच त्यांच्या काळात वीज, रेल्वे, रस्ते आणि वायुमार्ग यांची सुविधा सुरु झाली. होती.
पण माणसाचा काळ आणि वेळ एकसारखी कधीच राहात नाही. उस्मान अलीचं उदाहरण पाहून आपणही हेच म्हणू, हो ना?