computer

जगात या ५ शहरांमध्ये पाण्यासाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागतात !!

बाटली बंद पाण्याचा वापर आता प्रतिष्ठेचा विषय राहिलेला नाही. प्रवासात अगदी सगळीकडेच पिण्याचे पाणी मिळेल असे नाही. बाटलीबंद पाणी म्हणजे स्वच्छतेची हमी असे मानले जाते. वस्तुस्थिती अशी आहे की बाटलीबंद पाण्याचा वापर ही आपल्या जीवनातील एक आवश्यक गरज झालेली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे जगात निदान अजूनतरी पिण्याचे पाणी सहज मिळेल अशी व्यवस्था नाही. निदान भारतात पूर्वी 'पाणपोई' ही संकल्पना अस्तित्वात होती. पण 'पाणपोई' आता नामशेष झाली. गावागावात आता बाटलीबंद पाणी सहज विकत घेतले जाते. शहरांत तर वेगवेगळ्या ब्रॅंड्सचे पाणी विकले जाते.

भारतात पाण्याच्या बाटलीची किंमत किती असते? साधारण १५ ते २० रुपये. पण जगात अशी काही शहरे आहेत ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीच्या किमती खूप जास्त आहेत. या किमतीचा नुकताच अभ्यास करण्यात आला. अमेरिकेची ३० शहरं व इतर जगभरातले १०० शहर यांच्या किंमतीची तुलना करण्यात आली. ही शहरं निवडताना पर्यटनस्थळे असणारी शहरं निवडली गेली. तसेच अशीही शहरं निवडण्यात आली जिथे पाण्याची कमतरता आहे. प्रत्येक शहरात या बाटल्या वेगवेगळ्या ब्रँडखाली विकल्या जातात. एका सुपरमार्केट मध्ये जाऊन इव्हियन, पेरीयर/नेस्ले व कोकाकोला या तीन ब्रँडच्या प्रत्येक बाटलीची सरासरी किंमत काढण्यात आली. कोणत्या शहरांमध्ये सर्वात महाग आणि स्वस्त बाटलीबंद पाणी आहे हे पाहण्यासाठी या सर्व भिन्न ब्रँडच्या किंमतीची सरासरी करण्यात आली.

अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात आणि जगभरातल्या इतर शहरात पाण्याची किंमत कशी बदलते याचा अभ्यास करून यादी काढण्यात आली.  यामध्ये जगात सर्वात महाग पाण्याची बाटली मिळणारी ५ शहरं आणि सर्वात स्वस्त पाण्याची बाटली मिळणारी ५ शहरं खालील प्रमाणे आहेत.

सर्वात महाग पाण्याची बाटली मिळणारे ५ शहरे व प्रत्येकी एका बाटलीची किंमत :

१. ओस्लो, नॉर्वे -$१.८५ ( ₹ १३४.५० )
२. व्हर्जिनिया बीच, USA -$१.५९ ( ₹ ११५.५०)
३. लॉस अँजेलीस , USA - $ १.५४ (₹ ११२)
४. न्यू ओरलीन्स, USA -$ १.४८( ₹ १०७.५०)
५. स्टोकहोम, स्वीडन - $१.४७ ( ₹ १०७. ८०)

सर्वात स्वस्त पाण्याची बाटली मिळणारे ५ शहरे व प्रत्येकी एका बाटलीची किंमत :

१. बेरूत, लेबनन -$ ०.०४ ( ₹ ३ )
२. बंगलोर, भारत - $०.१३ ( ₹ १०)
३. अक्रा, घाना - $ ०.१६ (₹ १२)
४. लागोस, नायजेरिया -$ ०.१७ (₹ १२.६०)
५. इस्तंबूल, तुर्की - $ ०.१८ (₹ १३)


पाण्याची किंमत बाहेर बाटली विकत घेताना जास्त कळते हेच खरं.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required