या बाई चक्क दोन वर्षे अंतराळात राहिल्या आणि सर्वाधिक काळ अंतराळात राह्ण्याचा केला विक्रम
अमेरिकेच्या नासाची अंतराळवीर पेगी व्हीटसन या महिलेनं आपल्या दोन साथीदारांसह पॅराशूट लँडिंग केलं आणि त्यासोबत आपल्या करियरमध्ये अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत सर्वात जास्त काळ म्हणजे एकूण ६६५ दिवस घालविण्याचा रेकॉर्ड पण केलं आहे. ६६५मध्ये म्हणजे थोडेथोडके नाही, चांगली दोन वर्षं होतात हो..
या खेपेला ५७ वर्षीय पेगी यांनी साधारणत: ९ महिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) मध्ये काम केलं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे पृथ्वीपासून ४०० किलोमीटरवर आहे. या स्टेशनचा वापर हा संशोधनासाठी केला जातो. १९९६ साली अंतराळवीर झालेल्या पेगी या स्पेस्स्टेशनच्या कमांड ऑफिसर् पहिल्या महिला आहेत. तसेच त्या नासाच्या ॲस्ट्रॉनॉट कोअर या संघटनेच्या प्रमुख बनणाऱ्या पहिला महिला आहेत!!