या रशियन माणसाला भारतात भिक मागावी लागली, पण.....वाचा पुढे काय झाले !!!

भारत भ्रमण करायला अनेक परदेशी पाहुणे येतात, तसाच रशियाचा असलेला ‘एवँग्लीन’ हा तरुण देखील भारतात आला. २४ सप्टेंबर रोजी तो चेन्नईवरून कांचीपुरमजवळच्या मंदिरे फिरत होता. तेव्हा त्याच्याकडचे पैसे संपले. म्हणून तो ATM मध्ये गेला तर तिथंही त्याला पैसे काढता येईनात. काही वेळाने त्याच्या लक्षात आले की त्याचा ATM चा PIN लॉक झालेला आहे.

पैसे नसल्याने त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. त्यानं कुमारकोट्टम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भीक मागायला सुरुवात केली. स्थानिक पोलिसांना हे समजल्यानंतर त्यांनी तातडीने एवँग्लीनला पोलीस स्टेशनमध्ये नेले. त्याचा पासपोर्ट व व्हिसा तपासल्यानंतर पोलिसांनी त्याला ५०० रुपये देऊन चेन्नईपर्यंतच्या प्रवासासाठी मदत केली.

ही बातमी खुद्द सुषमा स्वराज यांना समजली.   त्यांनी तातडीने ट्विट केले की ‘एवँग्लीन, रशिया हे आमचं मित्र राष्ट्र आहे. माझे अधिकारी तुला या अडचणीत चेन्नईमध्ये मदत करतील’. काही वेळात परराष्ट्र खातं कामाला देखील लागलं. पण एवँग्लीनपर्यंत पोहोचण्यास त्यांना अडचणी आल्या. सध्या त्याच्या पर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरुच आहेत.

मंडळी, अतिथी देवो भव म्हणतात ते हेच...

सबस्क्राईब करा

* indicates required