लालू प्रसाद यादव यांनी जज साहेबांना असं काही सांगितलं की लोक आपलं हसू आवरू शकले नाही !!
लालू प्रसाद यादव आजवर त्यांच्या विनोदी भाषणाने आणि त्यांच्या बोलण्याच्या खास अंदाजामुळे जास्त चर्चेत राहिले आहेत. सध्या त्यांच्यावर चारा घोटाळ्याची केस चालू आहे. याच केसच्या सुनावणीसाठी त्यांना काल सीबीआयच्या स्पेशल कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी जज शिवपाल सिंह साहेबांसमोर आपली कैफियत मांडली. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून कोर्टरूम मध्ये जमलेल्या लोकांना हसू आवरणं कठीण गेलं राव.
त्यांनी असं काय सांगितलं की लोक हसून हसून वेडे झाले ? खाली वाचा की !!
लालू प्रसाद त्यांच्या खास ढंगात म्हणाले की ‘जज साहेब जेल मध्ये ‘किन्नर’ लोक सुद्धा कैद आहेत. मी अधूनमधून त्यांची विचारपूस करत असतो पण त्यांच्या जवळ गेलं की ते लगेच लग्नासाठी प्रपोज करतात.’
एवढ्यावरच ते थांबले नाहीत बरं का. ते पुढे म्हणाले ‘जज साहेब, जेल मध्ये २ जज सुद्धा बंद आहेत. त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा देण्याबद्दल थोडा विचार करा.’
शेवटी त्यांनी जज साहेबांना डोकं थंड ठेवण्याबाबत सल्ला सुद्धा दिला. यावर जज साहेबांनी म्हटलं की ‘तुमची काही माणसं मला फोन करून त्रास देत असतात, त्यांना तेवढं गप्प करा.’
आता बोला...काय म्हणावं या माणसाला !!