या पाच देशांकडे किती मिसाईल्स आहेत माहीत आहे? यातल्या एकाकडे तर चक्क ७००० मिसाईल्स आहेत...
देशाची सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी गेल्या दोन दशकांमध्ये जगातल्या अनेक देशांनी क्षेपणास्त्र निर्मितीवर जोर दिला आहे. नवे जागतिक राजकारण आणि वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे प्रत्येक देशाला हे करणं गरजेचं होतं. अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या दरम्यान सुरु असलेलं तणावपूर्ण वातावरण हे ताजं उदाहरण आहे.
क्षेपणास्त्र म्हणजे काय ?
क्षेपणास्त्र म्हणजे काय, ते आधी आपण समजून घेऊया. क्षेपणास्त्र म्हणजे स्वतः चालू शकेल आणि आपल्या टार्गेटचा अचूक वेध घेऊ शकेल असं अस्त्र. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाने क्षेपणास्त्रांचा पल्ला हा प्रचंड वाढला आहे. तंत्रज्ञान जरी प्रगत झालं असलं तरी हे तंत्रज्ञान काही मोजक्या देशांकडेच आहे.
जगात फक्त ५ असे देश आहेत ज्यांच्याकडे आजच्या घडीला जगात कुठेही मारा करू शकेल अशी सक्रिय क्षेपणास्त्रे आहेत. ते ५ देश कोणते आहेत ? चला जाणून घेऊया.
३. इंग्लंड
सक्रिय क्षेपणास्त्रे : १२०
एकूण : २१५