जाणून घ्या जगातल्या पहिल्या ग्रुप सेल्फीची कथा.
काय मंडळी, झाले का शेल्फी काढून ?? झालं असेल तर हे पाहून घ्या जरा. तर काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला जगातल्या पहिल्या सेल्फीची कहाणी सांगितली होती. पण सेल्फीची मजा तर भल्यामोठ्या ग्रुपसोबत फोटो काढण्यात आहे. तर आज आम्ही शोधून काढली आहे जगातल्या पहिल्या ग्रुपसेल्फीची कथा !
१९२० साली काढलेला हा फोटो आजवर माहित असलेला पहिला ग्रुप सेल्फी आहे. १९२० च्या दशकात प्रसिद्ध असणाऱ्या बायरन (Byron) स्टुडियोजचे मालक, कर्मचारी आणि ग्राहक या फोटोत आहेत. बेन फलक या गृहस्थांनी कॅमेरा धरला आहे. या लोकांनी बरेच सेल्फी काढले असावेत असा अंदाज आहे.
न्यूयॉर्कमधल्या एका म्युझियमने बायरन आणि कंपनीच्या २३००० फोटोजचे डिजिटायझेशन केले, त्यात या ग्रुप सेल्फीचा शोध लागला आहे.
आणखी वाचा :
नॅशनल सेल्फी डे : 10 टिप्स ज्या तुम्हाला देतील सर्वोत्कृष्ट सेल्फी!
एका सेल्फीने सोडवली मर्डरची केस...पहा या सेल्फीमध्ये असं आहे तरी काय ?
व्हिडिओ- गरबा खेळता खेळता सेल्फी की सेल्फी घेता घेता गरबा?