computer

भारतातली राहण्यालायक १० शहरं...पाहा बरं या यादीत तुमचं शहर कुठल्या नंबरवर आहे ?

राव, पुणेकरांसाठी आज एक भन्नाट बातमी घेऊन आलोय. भारतातल्या राहण्यासाठी योग्य शहरांच्या यादीत पुण्याने पहिला क्रमांक पटकावलाय भाऊ. तब्बल १११ शहरांमधून पुणे पाहिलं आलंय. भारत सरकारने पहिल्यांदाच ‘लिवेबिलिटी इंडेक्स'चा अहवाल जाहीर केला आहे.

कोणत्या निकषांवर शहरांची निवड झाली ?

शहरातील राहणीमान, स्वच्छता, मुलभूत सुविधा, आर्थिक सुविधा, इत्यादी गोष्टींचा या यादासाठी विचार करण्यात आला होता. असे ७८ निकष आणि त्यासाठी १०० गुण ठेवण्यात आले होते. या गुणांची सुद्धा विभागणी करण्यात आली होती.

आर्थिक सुविधा - ५ गुण

सामाजिक विकास - २५ गुण

संस्थात्मक विकास - २५ गुण

भौतिक सुविधा - ४५ गुण

तर, या सर्व निकषांवर शहरांची निवड झाली. पुणे पहिल्या क्रमांकावर आलं आहे तर नवी मुंबईने दुसऱ्या आणि बृहन्मुंबईने तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. दिल्लीकरांना ही यादी निराश करू शकते कारण दिल्ली चक्क ६५ व्या क्रमांकावर आहे. पण खालच्या क्रमांकावर ते एकटेच नाहीत. या यादीत सर्वात खाली उत्तर प्रदेश मधल्या शहरांची नावे प्रामुख्याने आहेत. त्यापैकी अलिगढ हे ८६ व्या क्रमांकावर आहे. जम्मु भागातील अस्थिर राहणीमानामुळे जम्मूने ९५ वा क्रमांक मिळवलाय.

मंडळी, आता पाहूयात त्या शहरांची नावे ज्यांनी टॉप १० मध्ये जागा मिळवली....

१. पुणे

२. नवी मुंबई

३. बृहन्मुंबई

४. तिरुपती

५. चंदीगढ

६. ठाणे

७. रायपुर

८. इंदोर

९. विजयवाडा

सबस्क्राईब करा

* indicates required