व्हिडीओ ऑफ दि डे : धोनीने बॅट्समनला येड्यात काढलं....व्हिडीओ बघून धोनीला सलाम कराल !!
महेंद्र सिंग धोनीच्या स्टम्पिंग बद्दल बोलायचं झालं, तर तो आजच्या घडीला एकमेव असा विकेटकीपर आहे ज्याच्या नावावर १९० स्टम्पिंगचा रेकॉर्ड आहे. कुमार संघकाराच्या १३९ स्टम्पिंगचा आकडा सोडला तर इतर विकेटकीपर त्याच्या रेकॉर्डच्या जवळपासही पोहोचलेले नाहीत.
आज आम्ही धोनीच्या स्टम्पिंगबद्दल का बोलत आहोत ? तर त्याचं काय आहे ना राव, नुकतंच धोनीने पुन्हा एकदा आपल्या स्टम्पिंगने न्युझीलंडच्या टीमला तोंडात बोटे घालण्याची वेळ आणली आहे.
आता तुम्ही म्हणाल की धोनीची स्टम्पिंग तर आम्ही खूप बघितली आहे, मग यात काय खास आहे ? त्यासाठी हा व्हिडीओ बघा राव.
धोनीने बॅट्समनला येड्यात काढलंय.
काल भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रंगला. या सामन्यात न्यूझीलंडच्या ‘जेम्स नीशम’ याने ४४ रन्स करून भारताची डोकेदुखी वाढवली होती. सामना हातून जातोय की काय असं वाटत होतं, पण क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतं. पुढचाच बॉल जेम्स निशमकडून हुकला. भारतीय संघाने हा LBW असल्याची अपील केली. पण हे सिद्ध होतंय न होतंय इतक्यात धोनीने विजेच्या चपळाईने गाफील जेम्स नीशमला रन आउट केलं भाऊ. हे घडलं अगदी काही सेकंदाच्या वेळेत. हे घडल्यावर जेम्स निशमचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
मंडळी, आजवर धोनीने फक्त स्टम्पिंगची कमाल दाखवली होती, पण या सामन्यात त्याने विजेच्या वेगाची स्टम्पिंग आणि अक्कल हुशारीचं अद्भुत रसायन दाखवून दिलं आहे.
याच सामन्यात धोनीने त्याच्या मराठी चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिलाय. केदार जाधवला सल्ला देताना धोनी चक्क मराठीतून बोलला आहे. त्याने केदार जाधवला "घेऊन टाक" म्हटलं. हा पाहा तो व्हिडीओ !!
.#AskStar #askstar sunny sir who will paly no.4? And listen Dhoni's marathi style.. pic.twitter.com/uZrFWE4h8s
— Shishupal Kadam (@RealShishupal) February 3, 2019