बॉक्स मधून सोन्याची वीट काढा आणि घरी घेऊन जा....दुबई मधलं हे चॅलेंज कोण कोण स्वीकारणार ?
मंडळी, दुबई विमानतळावर सध्या एक अनोखं चॅलेंज ठेवण्यात आलं आहे. चॅलेंज अगदी सोप्पं आहे. एका बॉक्स मध्ये सोन्याची वीट ठेवली आहे, ती बाहेर काढायची आहे. हे काम केलं तर तीच सोन्याची वीट तुम्हाला बक्षीस म्हणून मिळणार. आता तुम्ही म्हणाल “यात कसलं आलंय चॅलेंज ?” मग हा व्हिडीओ एकदा बघाच.
Dubai airport. Take it if you can. pic.twitter.com/3dJhIO6E31
— Aviator Anil Chopra (@Chopsyturvey) March 26, 2019
तर, दुबई विमानतळावर काही दिवसांसाठी हे चॅलेंज ठेवण्यात आलं आहे. कोणीही येऊन आपलं नशीब आजमावू शकतं. या व्हिडीओ वरून तुम्हाला समजलं असेलच की हे वाटतं तितकं सोप्पं नाही. विटेचं वजन आहे तब्बल २० किलो आणि ज्या छिद्रातून वीट बाहेर काढायची आहे ते छिद्र जेमतेम हात जाऊ शकेल इतकं लहान आहे. या दोन अडथळ्यांमुळे कोणालाही हे चॅलेंज पूर्ण करता आलेलं नाही.
मंडळी, तुम्ही जर पुढच्या काही दिवसात दुबईला जाणार असाल तर तुमचं नशीब नक्कीच आजमावून बघा. कदाचित ती २० किलोची वीट बोभाटाच्या वाचकाच्या नशिबी असावी !!! मग कधी जाताय राव ??