नासा चंद्रावरच्या विष्ठा आणि लघवीने भरलेल्या ९६ बॅगा पृथ्वीवर परत का आणणार आहे ??

मंडळी, माणसाची एक वाईट सवय आहे. ती म्हणजे जाईल तिथे कचरा करण्याची. आता माणूस चंद्रावर गेला तर तिथे पण माणसाने घाण करून ठेवली आहे. हातोडे, खिळे, चिमटे, कुदळी, फावडे, पाठीवर घ्यायच्या बॅगा, टॉवेल्स, रूमाल. ही शॉपिंगची लिस्ट नाही भाऊ, या गोष्टी माणूस चंद्रावर सोडून आला आहे. हे तर काहीच नाही, चंद्रावर मानवी विष्ठा, लघवी आणि उलटी यांनी भरलेल्या ९६ बॅगा आहेत.
हे सगळं आज सांगण्याचं कारण म्हणजे नासा आता या ९६ बॅगा परत पृथ्वीवर आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी एक विशेष मोहीम आखण्यात येणार आहे.
आम्हाला माहित आहे तुम्ही कमेंट मध्ये काय म्हणणार आहात. तुम्ही म्हणाल की ही घाण परत पृथ्वीवर का आणायची आणि त्यासाठी एवढे पैसे खर्च करून मोहीम आखायची म्हणजे नासावाल्यांच डोकंच फिरलंय.
हे सगळं विचारण्यापूर्वी या मागचं कारण जाणून घ्या.
त्याचं काय आहे ना वैज्ञानिकांना या बॅगांवर संशोधन करायचं आहे. त्यांना पहायचं आहे की या ५० वर्षात चंद्राच्या वातावरणाचा बॅगांवर काय परिणाम झाला आहे. चंद्रावरचे कॉस्मिक किरण आणि सूर्यप्रकाशाचा मारा यात जीवन कधीपर्यंत तग धरून राहू शकतं ? या अभ्यासातून पुढील मोहिमांसाठी नवीन माहिती मिळणार आहे. जसे की लांब पल्ल्याच्या मोहिमा आणि मंगळवारची मानवी मोहिम.
मंडळी, या माहितीच्या आधारे पृथ्वीवर जीवन कसे तयार झाले यावर पण संशोधन होईल. याखेरीज चंद्रासारख्या उजाड ग्रहावर जीवन तयार करायचंच झालं तर ते शक्य आहे का हेही समजेल.
आता प्रश्न पडतो की ही घाण चंद्रावर आली कशी ?
याचं उत्तर सोप्पं आहे. अवकाश यानातील ओझं कमी करण्यासाठी अंतराळवीरांनी अनावश्यक गोष्टी चंद्रावरच सोडल्या आहेत. जाताना ओझं वाटत नव्हतं आणि येतानाच ओझं झालं असं कसं ? तर त्याचं असं आहे, अंतराळवीरांनी १९६९ ते १९७२ पर्यंत केलेल्या मोहिमांमध्ये चंद्रावरचे एकूण ३८२ किलो दगड पृथ्वीवर आणले होते. हे वजन पेलावं म्हणून अवकाश यानातील बऱ्याच गोष्टी मागे सोडण्यात आल्या.

मंडळी, १९५९ साली जेव्हा पहिल्यांदा माणूस चंद्रावर पोहोचला तेव्हा तर त्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता. चंद्रावर पोहोचल्यावर कोणालाही आनंदच होईल, पण त्यांच्या आनंदाला आणखी एक कारण होतं. ते म्हणजे एकदाचं सगळ्या घाणीने भरलेल्या पिश्व्या फेकून देता येतील. त्यांनी ताबडतोब यानात जमा झालेल्या पिशव्या चंद्रावर फेकून दिल्या.
पण सगळ्याच गोष्टी चंद्रावर फेकून देण्यात आलेल्या नाहीत. काही गोष्टी मुद्दाम ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी आमचा खालील लेख वाचायला विसरू नका.
विष्ठा, उलट्या, रिकाम्या बॅगा, झेंडे.... अजून काय काय कचरा सोडून आलाय मानव चंद्रावर?
तर मंडळी, माणसाने पृथ्वी तर दुषित केलीच आहे पण चंद्राला पण सोडलेलं नाही. आता ही घाण परत पृथ्वीवर येणार आहे, पण एका चांगल्या कारणासाठी !!
आणखी वाचा :
अशी असते अंतराळात टॉयलेटची व्यवस्था !!
चक्क झोपण्यासाठी १२ लाख रुपये मिळतील ?...नासा मधल्या या अनोख्या नोकरीबद्दल माहित्ये का ?
आणि अखेर चंद्रावर पाणी सापडले !! whatsapp विद्यापीठातली नाही, खरोखरची बातमी आहे राव !!
अंतराळात राहून हा माणूस चक्क चालणं विसरला? जाणून घ्या असं का झालं असेल..