गटारी पेश्शल: देशोदेशीच्या दारवा !!!
आषाढातील अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या. दुसर्या दिवसापासून श्रावण सुरु.म्हणून या अमावस्येला मनमुराद दारु पिण्याचा नवा प्रघात आहे.महाराष्ट्रातील दारुबंदी संपल्यानंतर आणि गेल्या दशकात हाती चार पैसे असणार्यांची संख्या वाढल्यावर ही "दिव्याची अवस " आहे हे आपण सगळेच विसरून गेलो आहोत.दारु हा आपल्या संस्कृतीचा भाग कधीच नव्हता पण इतर अनेक देशात "दारु" हा त्या त्या देशाचा संस्कृती विशेष आहे.
चला,गटारीच्या निमिताने बघू या देशोदेशीच्या दारवा !!!
व्हिस्की : 'माल्ट'सारख्या धान्याला आंबवून बनवलेली दारु म्हणजे व्हिस्की. ब्रिटिश राजवटीमुळे आपला आणि व्हिस्कीचा परिचय फारच जुना आहे. व्हिस्की हे स्कॉटलंडचे पेय. स्कॉटलंडच्या अस्मितेचा भाग. व्हिस्की बनवल्यानंतर ताबडतोब पिण्याची पध्दत नाही. व्हिस्की बनवल्यावर तीन ते चार वर्षे व्हिस्की मुरवण्यात जातात. या दरम्यान ओक लाकडाच्या पिंपात ही दारू साठवली जाते आणि त्या लाकडाचा सुगंध दारुला चढतो.आपल्याकडची देशी व्हिस्की म्हणजे कृत्रिम सुगंध आणि रंग वापरून बनवलेली किंवा चांगल्या(अस्सल) दारूत मद्यार्क (अल्कोहल) मिसळून ब्लेंड केलेली दारु. त्यामुळे आपली व्हिस्की म्हणजे पैठणीच्या चिंध्यांची बाहुली.खानदानी व्हिस्की बोले तो "स्कॉच " व्हिस्की. त्यातही सिंगल माल्ट म्हणजे ऊच्च वर्णीय व्हिस्की. बाकी सगळ्या "मला पण व्हिस्की म्हणा" या जातकुळीतल्या.फक्त स्कॉच व्हिस्की लिहिताना स्पेलिंग फार जपून करावे लागते. स्कॉचबद्दल लिहिताना स्पेलिंग whisky असे असते तर इतर सर्व whiskey !!
जगातल्या महागड्या व्हिस्कीचा बाजारभाव ऐकलात तर देशी व्हिस्कीचा खंबा पिण्याची नशा पण एका मिनिटात खाडकन खाली उतरेल.
Balvenie 50 Year Old Single Malt Scotch Whisky : $ ४०,००० म्हणजे रुपये २,८०,००० फक्त.
आणखी वाचा :
गटारी पेश्शल-'रम'ची रांगडी रंगत
गटारी पेश्शल- अंगूरकी बेटी -ग्रापा
गटारी पेश्शल-व्होडका водка-फ्रॉम रशिया विथ लव्ह !!