गटारी पेश्शल-व्होडका водка-फ्रॉम रशिया विथ लव्ह !!
तुम्हाला रशियन भाषा येते ? नाही ? काही हरकत नाही. चार पेग व्होडकाचे मारा आणि तोंडातून येणारा प्रत्येक शब्द आपोआप रशियन भाषेतला असेल.
ओठातून थेट डोक्यात जाणार्या ज्या दारवा आहेत त्यापैकी एक म्हणजे व्होडका.व्होडकात मद्यार्काचे प्रमाण ३७.५ ते ४० टक्के असते त्यामुळे "मेंदूशी थेटभेट" असे व्होडकाचे वर्गीकरण आहे.
आपल्याकडे व्होडका 'फ्रॉम रशिया विथ लव्ह ' आली आहे पण व्होडका ही रशियाची मक्तेदारी नाही व्होडका बेलारुस, इस्टोनीया फिनलंड आइसलंड,लाटव्हीया लिथुआनीया पोलंड, युक्रेन या देशात व्होडका ही मध्ययुगीन परंपरा आहे. त्यामुळे या देशांना "व्होडका बेल्ट" असेही म्हटले जाते. व्होडका या देशात उपलब्ध असलेल्या धान्यापासून किंवा बटाटे आंबवून तयार केली जाते.
आता, बटाट्यापासून तयार केलेली व्होडका उपासाला चालते का ? असा बावळट प्रश्न करणार्याला आपल्या मित्रमंडळातून ताबडतोब हाकलून द्यावे हे उत्तम. व्होडका एकट्याने पिऊ नये हे मात्र खरे आहे. रशियन कम्युनिस्टांची ही आवडती दारु असल्याने चार "कॉम्रेड " लोकांना सोबत घेऊन प्यायल्यास ती धडक पथकासारखी मेंदूत पोहचते.
व्होडका ही "निट" प्यायची दारु आहे पण पुन्हा एकदा, कम्युनीस्ट दारु असल्याने इतर दारुंसोबतच्या कॉकटेल मध्ये ती घरच्या पंगतीला बसल्यासारखी जाउन बसते.
स्मिरनॉफ असो वा अब्सोल्युट व्होडकानी घशाला सतत कोरड पडते आणि डीहायड्रेशन करते त्यामुळे नवागतांनी जरा जपूनच प्यावी आणि डोळ्यानी व्होडका पिण्याच्या वाटेला (आयबॉलींग ) तर चुकूनही जाऊ नये.
आणखी वाचा :
गटारी पेश्शल-'रम'ची रांगडी रंगत
गटारी पेश्शल- अंगूरकी बेटी -ग्रापा
गटारी पेश्शल: देशोदेशीच्या दारवा !!!