computer

चामड्याला आला आहे स्वस्त आणि मस्त पर्याय!! नक्की काय केलं या दोघांनी पाहा!!

चामड्याची उत्पादने निसर्गासाठी हानिकारक असतात. कशी ते आधी समजून घेऊया.

कोणत्याही कातड्याला वापरण्या योग्य बनवण्यासाठी मोठ्याप्रमाणात रसायनांचा मारा करावा लागतो. ही रसायने निसर्गासाठी हानिकारक तर असतातच, पण या रसायनांमुळे कातड्याचं विघटन होत नाही. प्रत्येकालाच  कातड्याच्या वस्तू परवडत नाहीत म्हणून हल्ली खोट्या कातड्याच्या वस्तू बाजारात मिळतात. हे खोटं कातडं प्लास्टिकपासून तयार केलेलं असतं.

 

एकंदरीत कातड्याच्या वस्तू निसर्गासाठी हानिकारकच. मग करायचं काय? मेक्सिकोच्या दोन व्यावसायिकांकडे या प्रश्नाचं उत्तर आहे.

‘अॅन्द्रीयानो दि मार्टी’ कंपनीचे मालक अॅन्द्रीयान लोपेझ वेलार्दे आणि मार्टी काझारेज या व्यावसायिकांनी चक्क निवडुंगापासून कातडं तयार केलं आहे. या निवडुंगाचं नाव आहे देझर्टो. निवडुंगच का ? तर त्याची अनेक कारणे आहेत.

कातडे कमावण्यासाठी प्राण्याला लहानाचं मोठं करावं लागतं, त्यासाठी भरपूर प्रमाणात पाण्याची गरज  पडते. निवडुंग मात्र अत्यंत कठीण अशा वातावरणातही कमीतकमी पाण्यात सहज वाढू शकतो. अॅन्द्रीयान आणि मार्टी यांनी मिळून निवडुंगावर प्रक्रिया करण्यासाठी रसायनांना टाळलं आहे. त्यांनी नैसर्गिक रंग तयार केले आहेत. निवडुंगापासून तयार केलेलं असल्याने या कातड्याचं सहज विघटन होऊ शकतं हे वेगळं सांगायला नको.

अॅन्द्रीयान आणि मार्टी यांनी हे नवीन कातडं सर्व आकारात आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध करून दिलं आहे. शूज, कार सीट्स, बॅग्स आणि कपडे सुद्धा या कातड्यापासून तयार करण्यात आले आहेत. राहता राहिला प्रश्न पैशांचा तर ग्राहकांना खऱ्या कातड्या एवढेच पैसे मोजावे लागणार आहेत.

तर, निवडुंगाच्या सालीपासून तयार केलेलं हे कातडं खऱ्या कातड्यासारखं दिसत नसलं तरी चांगला पर्याय ठरू शकतं. तुम्हाला कशी वाटली ही भन्नाट आयडिया?

सबस्क्राईब करा

* indicates required