स्वित्झर्लंडच्या पर्वतावर भारताचा तिरंगा का फडकतोय??
आज अख्ख जग कोरोनाशी लढतंय. आपण सगळे मिळून कोरोनाला हरवू हा संदेश पोहोचवण्यासाठी स्वित्झर्लंड जगभरातील देशांचे झेंडे फडकवत आहे. नुकतंच त्यांनी भारताचा तिरंगा Matterhorn पर्वतावर फडकवला.
Matterhorn पर्वत स्वित्झर्लंड आणि इटलीच्या सीमेवर आहे. स्वित्झर्लंडसाठी हा पर्वत अत्यंत महत्त्वाचा आहे. मागच्या काही दिवसांपासून या पर्वतावर जगभरातील अनेक झेंडे फडकवण्यात येत होते. नुकतंच अमेरिकेचा झेंडा फडकवण्यात आला होता. कालच्या शुक्रवारच्या रात्री या पर्वतावर भारताचा तिरंगा दिसून आला.
हे काम गॅरी हॉपस्टेटर या कलाकाराने केलं आहे. याबद्दल माहिती देताना अधिकृत ट्विटर हँडलवरून भारतीयांसाठी एक खास संदेश देण्यात आलाय. हा ट्विट पाहा.
The Indian flag on the Matterhorn, Switzerland's landmark, is intended to express our solidarity and give hope and strength to all Indians. #Hope #Zermatt #Matterhornhttps://t.co/qFjiKuZNsE@MySwitzerlandIN pic.twitter.com/C8Ut0kqfZ1
— Zermatt - Matterhorn (@zermatt_tourism) April 18, 2020
तर मंडळी, कोरोनाला हरवण्यासाठी आपण सगळे एक आहोत हा संदेश देण्याची ही पद्धत अफलातून वाटते. जगभरातून त्याचं कौतुक होत आहे. तुम्ही काय म्हणाल.