computer

आज दहीहंडी पाहायला जाताय? या ६ नक्कीच गोष्टी लक्षात ठेवा

आज दहीहंडीचा जोश सगळीकडे भरून वाहतोय. मोठ-मोठ्या मंडळांच्या हंड्या तर आहेच, पण  सोसायट्यांमध्येही बालकृष्ण आणि बालराधा सजून-धजून मिरवताना दिसत आहेत. या वर्षी हंडीच्या उंचीवर बंधन असले तरी हौशे-नवशे-गवशांची  हंड्यांच्या ठिकाणी गर्दी होणार हे नक्की. तर आज बोभाटा घेऊन आले आहे अशा गर्दीच्या ठिकाणी काय काळजी घ्यावी याची यादी..

 

 

१. पैसे आणि दागिने सांभाळा..

गर्दीच्या ठिकाणी चोरी करणार्‍यांचं खूप फावतं. त्यामुळे आपले सगळे पैसे एकाच ठिकाणी न ठेवता दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.  अशा ठिकाणी दागिने शक्यतो न घातलेलेच बरे. घातलेच, तर त्यांची विशेष काळजी घ्या. विशेषत: मंगळसूत्रं आणि गळ्यातल्या चेन्स पळवण्याच्या घटना अशा वेळेस जास्त घडतात. पर्सेस कापण्याचे प्रकारही सर्रास घडतात. तेव्हा, आपल्या सामानाची काळाजी आपणच घेणं महत्वाचं. 

२. फोन सांभाळा

दिवसेंदिवस स्मार्टफोन्सच्या चोरींमध्ये वाढ होतेय. पैशांइतकाच, किंबहुना पैशांहून अधिक किमती आपला फोन आहे. त्यातले फोटोज, मेसेजेस, आपल्याच मूर्खपणामुळे आपण त्यात स्टोअर केलेले पासवर्ड्स आणि इतर दुसर्‍याच्या हाती पडू नये अशी माहिती!!! त्यामुळे एकतर फोन्स घेऊन जाऊ नका, किंवा घरातला एखादा जुना फोन सोबत बाळगा.

फोनशिवाय बाहेर पडणं अशक्य आहे, पण त्याचसोबत  फोन जपलाही पाहिजे. नाही का? 

३. भांडणं सोडवायला नक्कीच जाऊ नका..

गर्दीत कुणाची भांडणं सोडवायला नक्कीच जाऊ नका. अर्थात कुणाचा जीव जात असेल, तर हस्तक्षेप नक्कीच करायला हवा. पण इतरवेळी ही गर्दीची मानसिकता कधीही बदलू शकते आणि भांडण सोडवायला गेलेल्या माणसाच्याच जीवावर बेतू शकतं. 

४. संशयास्पद गोष्ट पोलिसांना तात्काळ कळवा

१९९३च्या बॉंबस्फोटांच्या घटनांवरून दिसतं की वरवर क्षुल्लक वाटणार्‍या घटनांकडे दुर्लक्ष केलं तर नंतर मोठ्या आणि महाभयानक घटना घडू शकतात. त्यामुळं काहीही संशयास्पद दिसलं तर पोलिसांना ताबडतोब कळवा. त्याचसोबत आसपास काही वाईट आणि असामाजिक (ऍंटिसोशल) घडत असेल तर ते ही कळवा. 

तुमचा एक फोन कॉल कदाचित पुढचं मोठं संकट टाळू शकेल. 

६. मुलं सांभाळा..

दहीहंडी पाहण्याची लहान मुलांना खूप उत्सुकता असते. आई-बाबा-काका-आजोबा असं  कुणीतरी मुलांना हात धरून मग दहीहंडी दाखवायला घेऊन जातात आणि चुकून एखाद्या बेसावध क्षणी हा हात सुटतो.. आणि आपण मग मुलाला घेऊनच गेलो नसतो तर.... असं म्हणून पश्चात्ताप करण्याची वेळ येते..

सबस्क्राईब करा

* indicates required