computer

सामान्य लोक सुपात तरी अब्जोधीश तुपात....कोरोना काळात या अब्जाधीशांची संपत्ती एवढी वाढली !!

२०२० हे वर्ष अनेकांसाठी नुकसानीचे गेले आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. मात्र दुसरीकडे अनेक अब्जोधीश उद्योगपती मात्र दिन दुप्पट रात चौपट पद्धतीने श्रीमंत झाले आहेत. खाली अशाच काही उद्योगपतींची यादी दिली आहे. त्यांची वाढलेली संपत्ती बघून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.

१) जेफ बेझोस

अमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांनी जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची २०२० साली एप्रिलपासून तर डिसेंबरपर्यंत वाढलेली संपत्ती ही ७४०० कोटी डॉलर्स एवढी आहे.

२) मार्क झकरबर्ग

फेसबुकचे मालक मार्क झकरबर्ग यांची संपत्ती यावर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ४३०० कोटी डॉलर्स एवढी वाढली आहे.

३) बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे अनेक वर्ष जागतिक श्रीमंत लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. यावर्षी देखील त्यांनी मोठी कमाई केली आहे. २२०० कोटी डॉलर्स एवढी त्यांची कमाई आहे.

४) वॉरन बफे

जागतिक गुंतवणूकदार ज्यांना गुरुस्थानी मानतात असे वॉरन बफे यांनी देखील १७०० कोटी डॉलर्स एवढी कमाई केली आहे. 

५) लॅरी एलिसन

ओरॅकल कंपनीचे संस्थापक लॅरी एलिसन यांनी एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान २८७० कोटी डॉलर्सची कमाई केली आहे.

६) एलन मस्क

एलन मस्क हे नाव गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. त्यांनी २०२० सालच्या एप्रिल ते डिसेंबर या काळात तब्बल ११८२ कोटी डॉलर्स एवढी कमाई केली आहे.

७) मुकेश अंबानी

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी यावर्षी ३७६० कोटी डॉलर्स कमावले आहेत.

८) गौतम अदानी

अदानी ग्रुपचे चेयरमन गौतम अदानी यांनी देखील यावर्षी मोठी कमाई केली आहे. त्यांच्या संपत्तीत १८९० कोटी डॉलर्सची भर पडली आहे

९) सर्जी ब्रेन

गुगलचे संस्थापक सर्जी ब्रेन यांनी आपल्या कमाईचा आलेख सतत चढता ठेवला आहे. यावर्षी त्यांनी २४८० कोटी डॉलर्स एवढी कमाई केली आहे.

१०) अमांसीओ ओरतेगा

झारा कंपनीचे मालक ओरतेगा यांनी १८४० कोटी डॉलर्स एवढी कमाई केली आहे.

११) जॅक मा

चीनमधील सर्वाधिक श्रीमंत गृहस्थ आणि अलिबाबा ग्रुपचे चेयरमन जॅक मा यांनी एप्रिल ते डिसेंबर 2020 या काळात २२०० कोटी डॉलर्स एवढी कमाई केली आहे.

१२) स्टीव्ह बॉलमेर

लॉस अँजलीस क्लिपर या कंपनीचे मालक बॉलमेर यांनी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २२९० कोटी डॉलर्स एवढी कमाई केली आहे.

१३) लॅरी पेज

गुगलचे दुसरे संस्थापक लॅरी पेज यांनी यावर्षी २५१० कोटी डॉलर्स कमावले आहेत.

 

या सर्व आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे सामान्य लोक जरी सुपात असले तरी अब्जोधीश मात्र चांगलेच तुपात आहेत.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required