पावरी हो रही है आणि श्वेताचं मार्केट खाणारा हा चाचा आहे तरी कोण? ह्या व्हायरल फोटोमागची गोष्ट वाचा !!
सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील बागपतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तेथील पाणीपुरी विक्रेत्यांमध्ये भांडण झाले आणि चक्क WWF सारखी फ्याटिंग सुरू झाली. व्हिडीओ वायरल होण्यासाठी एवढी गोष्ट देखील पुरेशी होती, पण यापेक्षा जास्त व्हायरल मात्र दुसरीच गोष्ट होत आहे.
जवळपास १५-२० लोक काठ्यांनी एकमेकांना मारत आहेत असा तो व्हिडीओ होता. पण या व्हिडिओत असणारे एक वयस्कर गृहस्थ मात्र त्यांच्या भन्नाट हेयरस्टाईलमूळे चांगलेच व्हायरल झाले आहेत. कालपासून मिम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
बागपत मधील मार्केटमध्ये एका ओळीत काही लोक पाणीपुरी विकतात, एका ग्राहकाला स्वतःकडे बोलविण्याच्या मुद्यावरून सुरू झालेले भांडण थेट फ्री स्टाईल हाणामारीत परिवर्तित झाले. ट्विटरवर यानंतर #chacha हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
या फायटिंगचा खरा विजेता चाचा आहे हे लोकांनी घोषित केले आहे. तसेच चाचाच्या हेयरस्टाईलची तुलना आईन्स्टाईनपासून तर थ्री इडियटमधल्या वायरसपर्यँत केली जात आहे.
पण व्हायरल झाला असला तरी चाचाला तुरुंगाची हवाही खावी लागली आहे. काहीही म्हणा पण चाचाने पावरी हो रही है आणि श्वेता मिम्सचे मार्केट डाऊन केले आहे हे नक्की...