व्हिडिओ- गरबा खेळता खेळता सेल्फी की सेल्फी घेता घेता गरबा?
उंच टॉवरवर, बंजी जम्पिंग करताना, ड्राईव्ह करताना , अगदी कुठं सेल्फी काढावे याला काही धरबंध नाहीय. पण आत्तापर्यंत कुणी नाचताना सेल्फी काढल्याचं पाहिलं नव्हतं. गरबा खेळताना तर नाहीच नाही.
कुणाचं तरी तिरकं डोकं चाललं आणि गरब्यामध्ये सेल्फी कधी, केव्हा आणि नक्की कोणत्या पोझला घ्यायचे याचा गेल्यावर्षीचा एक व्हिडिओच कालपासून पुन्हा सोशल मिडियावर फिरू लागलाय. हा व्हिडिओ थोडयाथोडकया नाही, तर जवळजवळ २०,००,०००लोकांनी पाहिलाय.
चला मग, आपण पण या स्टेप्स शिकूयात आणि सेल्फी घेता घेता गरबा खेळूयात!!