computer

ट्रॅक्टरची पुढची चाके लहान आणि मागची चाके मोठी का असतात? विज्ञान काय म्हणतं?

ट्रॅक्टर सोडले तर सहसा प्रत्येक वाहनाचे सर्व टायर्स हे सारख्याच आकाराचे असतात. पण ट्रॅक्टरची पुढची चाके लहान आणि मागची चाके मोठी असतात. असे का असते? याच प्रश्नाचं उत्तर आम्ही आज आज आम्ही सांगणार आहोत. 

कुठल्याही ट्रॅक्टरच्या इंजिनची क्षमता ही कार्सच्या तुलनेत दोन तृतीयांश असते. तसेच ट्रॅक्टरमध्ये चाकांना फिरवण्याची क्षमता दीड पट असते. गियरच्या मदतीने ट्रॅक्टरचा स्पीड कमी करून अधिक ट्रॅक्शन किंवा टार्क तयार केले जाते. हे टार्क ट्रॅक्टरमध्ये वजन ओढण्याचे काम करत असते. याच कारणाने या वाहनाला ट्रॅक्टर हे नाव पडले आहे. 

ट्रॅक्टरचे बहुतांश काम हे शेतात असते. अशा ठिकाणी माती आणि चिखल असण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही बघितले असेल कार किंवा बाईक चिखलात आणि मातीत फसून जातात तर ट्रॅक्टर सहज निघून जाते. याला कारणीभूत असतात ते मागचे टायर्स. मागचे टायर मोठे असल्याने ट्रॅक्टर न फसता निघून जाते. मागच्या टायर्सचा हा फायदा असला तरी ट्रॅक्टरला वळणे घेताना अडचण येऊ नये म्हणून पुढील टायर मात्र लहान ठेवलेले असतात. शेतांमध्ये काम करत असताना दर काही मीटर्सवर ट्रॅक्टर वळताना तुम्हाला दिसतील.

ट्रॅक्टरचे पुढचे टायर हे मागच्या टायर्सच्या मानाने लहान असले तरी त्यांचे वजन मात्र जास्त असते. ट्रॅक्टरचे इंजिन पुढे असल्या कारणाने वजन संतुलन करण्यासाठी पुढचे टायर भक्कम असणे गरजेचे असते. 

मागील काही वर्षात काही कंपन्या मागे आणि पुढे सारख्याच आकाराचे टायर्स असतील असे ट्रॅक्टर बाजारात आणत आहेत. चारी टायर्समध्ये समान ट्रॅक्शन होऊन ट्रॅक्टर फसत नाही.

ट्रॅक्टर्सबद्दल तुम्हाला ही माहिती माहित होती का? तुम्हाला लेख कसा वाटला? आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा. 

सबस्क्राईब करा

* indicates required