जायकवाडी धरणातलं पाणी अचानक झालंय हिरवं..

तर मंडळी,  मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणातलं पाणी अचानक हिरव्या रंगाचं झालंय.  या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळं धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक  झाली होती पण आता या हिरव्या रंगामुळं अनेक चर्चांना रंग चढतोय.  हा रंग शेवाळ्यामुळे आल्याचं बोललं जात असलं तरी या मागे प्रदूषणाचा हात असल्याचं पण चर्चेत आहे.

मराठवाड्यातल्या जनतेसाठी महत्वाचं असलेलं हे धरण औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वापरलं जातं. या संदर्भात जनतेनं घाबरून जाऊ नये असे आव्हानही करण्यात आलंय.  हा रंग शेवाळ्यामुळे आलाय की केमिकलमुळे याची तपासणी करण्यात येणार आहे.

अर्थातच, जायकवाडीचं पाणी हिरवं होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी २०१३ मध्ये सुद्धा इथलं पाणी हिरवं झालं होतं. या संदर्भात फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे आणि त्यात या मागं नाशिकपासून औरंगाबादपर्यंत होणारं नदीचं प्रदूषण कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय. 

 

जय हो. पानी तेरा रंग हरा कैसा ? भगवा का नाही ? जायकवाडी धरणातील पाणी दरवर्षी पावसाळा संपल्यानतर हिरवे होते मग चर्चा सुर...

Posted by Suneel Joshi on 8 ऑक्टोबर 2016

 

सबस्क्राईब करा

* indicates required