computer

अंधश्रद्धेपायी सुमारे दीडशे लोकांचा जीव घेणारे सालेम ट्रायल विच प्रकरण. काहीं निष्पापांना तर न्यायालयानेच फाशी सुनावली होती!!

जादूटोणा, भुताटकी, चेटूक अशा गोष्टींनी आजवर समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनाकलनीय घटनांमागे अशाच कुठल्या तरी दुष्ट शक्तींचा हात असतो यावर आजच्या काळातील सुशिक्षित लोकही विश्वास ठेवतात. अर्थात अशा गोष्टी फक्त आपल्या देशातच होतात असे नाही. पाश्चिमात्य देशांतही याप्रकारच्या अंधश्रद्धा पाळल्या जातात. सतराव्या शतकात इंग्लंडच्या मसॅच्यूसेट प्रांतातील सालेम गावात अंधश्रद्धेतूनच अशी घटना घडली होती ज्याबद्दल तिथले लोक आजही पश्चाताप करतात.

१७ व्या शतकातील ही घटना इतिहासात सालेम विच ट्रायल नावानी प्रसिद्ध आहे. यावेळी सुमारे २० लोकांना चेटकीण आणि भुताने पछाडल्याच्या संशयावरून फाशी देण्यात आली होती. खुद्द न्यायालयानेच त्यांना दोषी ठरवून फासावर लटकवले होते. मन सुन्न करणारी ही घटना नेमकी कशी सुरू झाली आणि याचा अंत कसा झाला जाणून घेऊया या लेखातून.

पूर्वीच्या काळी ख्रिश्चन आणि इतर धर्मीय लोकांतही भुताखेतांवर प्रचंड विश्वास होता. तसा तो आताही आहे. त्याकाळी कोणत्याही अनाकलनीय आणि आपत्तीजनक घटनेमागे दुष्ट शक्तींचाच हात असल्याचे मानले जात होते. अगदी सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हा समज इतका दृढ होता की, भूत झपाटल्याच्या संशयावरून एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहिले जात नसे.

सतराव्या शतकात १६८९ इंग्लंडचा राजा विल्यम आणि राणी मेरी यांनी फ्रांस आणि अमेरिकेविरोधात युद्ध पुकारले. या युद्धाने त्रस्त झालेल्या निर्वासितांनी मसॅच्यूसेट आणि त्यातही सालेम गावात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. निर्वासितांच्या या लोंढ्यामुळे या परिसरातील संसाधनांचा तुटवडा भासू लागला आणि या भागातील शांतता भंग झाली होती. आतापर्यंत शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण अचानक शिगेला पोहोचले तेव्हा इथल्या लोकांची अशी खात्री झाली की, यामागे नक्कीच कुठल्या तरी दुष्ट शक्तीचा हात असणार.

स्थानिक लोकांची मानसिकता अशी झालेली असतानाच एकामागे एक अशा काही घटना घडू लागल्या की लोकांचा अशा गोष्टींवरील विश्वास पक्का झाला. सालेम गावची शासकीय अधिकारी असलेले सॅम्युएल पॅरीस यांची ९ वर्षाची मुलगी एलिझाबेथ आणि ११ वर्षांची पुतणी ऐबिगेल या दोघींच्याही वागण्यात विचित्र बदल दिसू लागले. त्या दोघीही सामान्य माणसाना अजिबात जमणार नाहीत अशा चित्रविचित्र हालचाली करायच्या. तसेच त्या विचित्र आवाजात ओरडायच्या. त्यांचे म्हणणे होते की कोणी तरी अदृश्य व्यक्ती त्यांचा छळ करत आहे आणि त्यांना मारहाण करत आहे. दोघींच्या वागण्यातील हा बदल नेमका कशामुळे झाला आहे हे तपासण्यासाठी गावातील डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनीच सांगितले की या दोघींना भुताने झपाटले आहे.

त्यांच्या त्या अवस्थेने आधीच हैराण झालेल्या लोकांना हे ऐकल्यावर तर अजूनच धास्ती वाटू लागली. एकानंतर एक गावातील आणखीही मुलींना असाच त्रास सुरू झाला. त्यामुळे तर लोकांना खात्री पटली की गावात कुणीतरी जादूटोणा करत असून मुलींवर सैतानी कब्जा करण्यास मदत करत आहे. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी गावकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. मॅजिस्ट्रेट जोनाथन कॉर्वीन आणि जॉन हॅथ्रोन या दोघांवर या प्रकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली.

गावातील ज्या ज्या मुलींना या प्रकारचा त्रास होतोय त्यांना चौकशी साठी बोलावण्यात आले. तुमच्यावर कोणी तरी भानामती केली आहे किंवा तुम्हाला स्वतःच्या जाळ्यात ओढले आहे असे वाटते का? असे विचारल्यानंतर त्या मुलींनी टिटूबा, साराह गुड आणि साराह ऑसबॉर्न अशा तीन महिलांची नावे घेतली. या तिघींनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या दरम्यान त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांच्यावर चेटकीण असल्याचे आरोप करण्यात आले. सारा गुड आणि ऑसबॉर्न यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगितले पण टिटूबाने छळाला वैतागून सगळे आरोप मान्य केले.

तिने सांगितले की कोणीतरी काळा माणूस तिला आपल्या मनासारखे वागण्यास भाग पडतो. यात ती एकटीच नसून आणखीही काही साथीदार असल्याचे तिने सांगितले आणि गावातील काही महिलांची नावे न्यायाधीशांसमोर सादर केली. तिला वाटले असे केल्याने आपली सुटका होईल. पण, झाले नेमके उलटेच. लोकांच्या डोक्यात या कल्पनेने असे काही घर केले होते की, त्यांना कुणावरही संशय येऊ लागला. माणूस तर सोडाच पण, या संशयाच्या भोवऱ्यातून जनावरेही सुटली नाहीत.

अगदी चर्चच्या नन असलेल्या मार्था कॉरेवरही चेटकीण असल्याचा आरोप करण्यात आला. लोकांच्या डोक्यावर जणू परिणामच झाला होता. कुणालाही पकडून त्याच्यावर चेटूक किंवा चेटकीण असल्याचा आरोप केला जात असे. त्याला काही प्रश्न विचारले जात, जसे की स्वप्न काय पडतात? स्वप्नात काय दिसते? यात जरा जरी भुताखेतांचा उल्लेख केला की लगेच त्याला आरोपीच बनवले जात असे. अशातूनच कित्येक लोकांना फाशी देण्यात आली, कुणाला जिवंत जाळण्यात आले, तर कुणाला दगडाने ठेचून मारण्यात आले. लहान मुले देखील या प्रकारातून वाचली नाहीत. दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी त्यांच्यासमोर हाच एकमेव मार्ग होता.

हा सगळा प्रकार कित्येक महिने सुरू राहिला. सुमारे दीडशे निष्पाप लोकांनी यात आपला जीव गमावला. त्यानंतर इंग्लंडचे मंत्री कोटॉन मार्थ यांनी न्यायालयाने ही चौकशी त्वरित थांबवावी कोणत्याही पुराव्याअभावी निष्पाप लोकांना जीवे मारण्याची शिक्षा देऊ नये असे फर्मान काढले. न्यायालयाने मात्र मंत्र्यांचा आदेश खुंटीवर टांगून आपले काम सुरूच ठेवले. एखाद्या साथीचा रोग यावा आणि गावात शेकडोंना त्याची लागण होऊन मृत्यू व्हावेत त्याचप्रमाणे सालेम विच ट्रायलमध्ये जिथे तिथे चेटूक आणि चेटकीण सापडू लागले. फक्त अंधश्रद्धेच्या आधारे त्यांना फासावर लटकावण्यात आले. काही लोकांनी तर भीतीपोटी गावातून पळ काढला.

अशा सगळ्या अंधाधुंध काभारतात स्वतः गव्हर्नरनीच हस्तक्षेप केला आणि अशा प्रकारे पुराव्याअभावी लोकांना शिक्षा देणे योग्य नसल्याचे न्यायालयांना सुनावले. त्यांनी विच ट्रायलच्या आरोपाखाली तुरुंगात कैद असलेल्या लोकांना सोडून देण्याचे आदेश दिले.

शेवटी १६९७ मध्ये या सगळ्या प्रकाराला पूर्णविराम मिळाला असला तरी, ज्यांनी या प्रकारामुळे आपले आप्त गमावले, संशयाच्या नजरा झेलल्या त्यांची हानी भरून नव्हती. हा सगळा प्रकार पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे नंतर जाहीर करण्यात आले. निरपराध लोकांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांनाही नंतर फाशीचीच शिक्षा देण्यात आली.

ज्या लोकांना यामुळे त्रास सहन करावा लागला, ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले त्या सर्वांना ६०० युरोची नुकसानभरपाई देण्यात आली. पण शेवटी जे काही झाले ते अत्यंत क्रूर आणि निंदनीय होते हे मात्र नक्की.

महाराष्ट्रातल्या या चेटकीणींच्या घटनेबद्द्लही जाताजाता थोडे वाचा..

 

महाराष्ट्रातल्या नरभक्षक चेटकिणींचा अजब खटला...या खटल्याबद्दल तुम्ही नक्कीच वाचलं नसणार !!

चेटकीण म्हणून गावाने मलमूत्राने विटंबना केलेल्या स्त्रीने घेतलेली पद्मश्री पुरस्कारापर्यंत झेपही आवर्जून वाचा..

 

चेटकीण म्हणून गावाने मलमूत्राने विटंबना केलेल्या स्त्रीने घेतली पद्मश्री पुरस्कारापर्यंत झेप!!

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required