computer

वाहतूक नियमांचे शिस्तशीर पालन!! हा भारतातल्या कुठल्या राज्यातला फोटो असेल असे वाटते?

सर्वसामान्यांना सर्वात जास्त जर कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो म्हणजे ट्रॅफिक आणि बेशिस्त वाहतूक! रस्त्यावर वाहतूक करण्यासाठी पद्धतशीर नियम असताना सुद्धा नियम मोडून गाडी चालवणाऱ्या लोकांमुळे सर्वानाच त्रास सहन करावा लागत असतो. आता एखादा जर नियम पाळून गाडी चालवू लागला तर ती बातमी व्हावी अशी परिस्थिती असते.

सध्या व्हायरल होणारा एक फोटो याच पार्श्वभूमीवर कौतुकास्पद म्हणावा असा आहे. हा फोटो बघून कुणालाही हा परदेशातील सिन असावा असे वाटू शकते. जिथे उलट्या दिशेने सर्रास गाडी चालवताना लोक विचार करत नाहीत. तिथे रस्त्याच्या एका साईडला रांगेत गाड्या लावून लोक उभे आहेत.

हा फोटो आपल्याच देशातल्या मिझोराममधला आहे. सहसा रस्त्यावर दोन बाजूने वाहतूक सुरू असते. त्यावेळी ज्या बाजूने वाहतूक करायला हवी त्याच बाजूने गाड्यांनी जावे असा नियम असतो. पण लोकांना मात्र तेवढा धीर नसतो. मग कुठूनही गाडी घालून निघण्याचा प्रयत्न होतो. यातून मग गाडी ठोकली जाणे किंवा गाडी अशा पद्धतीने अडकणे ज्यामुळे उलट ट्रॅफिक अजून वाढेल अशा घटना नेहमीच दिसतात.

पण मिझोराम मधील हे दृष्य मात्र आश्चर्य वाटावे असे आहे. ना कुठला गोंगाट, ना हॉर्नचा आवाज ना कुणी फ्रस्ट्रेशन काढत आहे. आरामात लोक रांगेत थांबून रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत आहेत. न भूतो न भविष्यती असे हे दृश्य असल्याने साहजिक हा फोटो व्हायरल व्हायला वेळ लागला नाही.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील या घटनेचे कौतुक केले आहे. लोकांनी जर मिझोराम मधील या फोटोत दिसणाऱ्या दृश्याचे अनुकरण केले तर वाहतूकीची मोठी समस्या मिटू शकेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साधा एक माणूस देखील आपला पाय देखील बाहेर काढून उभा राहत नाही हे दृश्य खरोखर कौतुकास्पद आहे.

भारतात इतर ठिकाणी देखील जर अशा पद्धतीने वाहतुकीचे नियम पाळले जाऊ लागले तर होणारे अपघात, ट्रॅफिक जॅम असे अनेक चुकीच्या गोष्टी कमी होऊ शकतात. तुम्हाला हा फोटो बघून काय वाटते ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा...

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required