computer

त्यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याचे हक्क देण्यासाठी या १० भारतीय लोकांनी किती रुपये घेतले पाहा..

बॉलिवूडमध्ये विविध प्रकारचे सिनेमे बनत असतात. पण सध्या बायोपिकचा जमाना आहे. अनेक बड्या सेलब्रिटींपासून तर विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या लोकांवर गेल्या काही वर्षांत बायोपिक तयार झाले आहेत. यात सचिन, धोनी, संजय दत्त यांच्या सारख्या सेलब्रिटींचा समावेश करता येईल. पण स्वतःवर बनत असलेल्या सिनेमासाठी ही लोक किती पैसे घेत असतील हा विचार तुम्ही केला आहे का? नसेल केला तरी आम्ही सांगणार आहोत.

लक्ष्मी अग्रवाल

दीपिका पदुकोणचा छपाक नावाचा सिनेमा आला होता. यात तिने ऍसिड हल्ल्याचा बळी ठरलेल्या मुलीची भूमिका केली होती. मालती नावाच्या १५ वर्षीय मुलीवर तिच्याच एका ओळखीतील माणसाने ऍसिड हल्ला केला होता. या हल्ल्यातून कसेबसे बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल या मुलीचा पुढील संघर्ष या सिनेमात मांडण्यात आला होता. यासाठी तिला १३ लाखांची फी देण्यात आली होती.

पान सिंग तोमर

२०१२ साली आलेला पान सिंग तोमर हा सिनेमा आईच्या खुनानंतर पान सिंग तोमर या मुलाने एक राष्ट्रीय खेळाडू ते डाकू असा केलेला प्रवास यावर बेतलेला होता. यासाठी पान सिंग तोमरच्या पुतण्याने या सिनेमाच्या हक्कासाठी १५ लाख रुपये घेतले होते. या सिनेमात इरफान खानने पान सिंग तोमरची भूमिका केली होती.

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरवर 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' नावाचा सिनेमा आला होता. या डॉक्युमेंटरी सदृश सिनेमासाठी सचिनने तब्बल ४० कोटी रुपये घेतले होते.

प्रकाश आमटे

प्रकाश आमटे यांच्यावर महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्याचे काम प्रचंड आदर करावे असे आहे. नाना पाटेकर यांनी प्रकाश आमटे यांची केलेली भूमिका सर्वांना आवडली होती. या सिनेमासाठी प्रकाश आमटे यांनी स्वतःसाठी पैसे न घेता ते त्यांच्या प्रकल्पांना द्यायला सांगितले होते.

मेरी कोम

बॉक्सिंग या खेळात जगभर भारताचे नाव पोहोचवणारी खेळाडू मेरी कोम हिच्यावर आलेला सिनेमा 'मेरी कोम' याच नावाने आला होता. यात प्रियांका चोप्रा मेरी कोमच्या भूमिकेत होती. या सिनेमासाठी मेरी कोमने २५ लाख फी आकारली होती.

संजय दत्त

संजय दत्त हा प्रचंड प्रसिद्ध तितकाच कुप्रसिद्ध असलेला अभिनेता आहे. त्याच्या अवतीभोवती अनेक गोष्टी रचण्यात आल्या आहेत. संजू नावाचा सिनेमा त्याच्या आयुष्यावर येऊन गेला. यात रणबीर कपूर हा संजय दत्तच्या भूमिकेत होता. या सिनेमासाठी या सिनेमासाठी प्रोड्युसरने संजय दत्तला ९-१० कोटींची ऑफर दिली होती.

मोहम्मद अझरूद्दीन

क्रिकेटमध्ये अल्पावधीतच यशाच्या शिखरावर गेलेला मोहम्मद अझरुद्दीन नंतर फिक्सिंगच्या आरोपात चांगलाच बदनाम झाला होता. बॉलिवूडला या स्टोरीत मसाला दिसला आणि त्यांनी इम्रान हाश्मीला घेऊन अझर नावाचा सिनेमा बनवून टाकला. अझरने यातून पैसे घेतले नाहीत, कारण त्याला या माध्यमातून त्याची चुकीची प्रतिमा पुसायची होती.

मिल्खा सिंग

मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित भाग 'भाग मिल्खा.. भाग' हा सिनेमा तुफान चालला होता. यात फरहान अखतरने मिल्खा सिंग यांची भूमिका केली होती. या सिनेमाच्या हक्कांसाठी मिल्खा सिंग यांनी अवघा एक रुपया घेतला होता.

महावीर सिंग फोगट

दंगल हा आमीर खानचा देशात सर्वाधिक कमाई केलेला सिनेमा आहे. या सिनेमात महावीर फोगट यांनी आपल्या मुलींना कशाप्रकारे कुस्तीत चॅम्पियन बनविले याची स्टोरी आहे. या सिनेमासाठी महावीर फोगट यांनी ८० लाखांची फी आकारली होती.

महेंद्र सिंग धोनी

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार होण्यापूर्वी धोनीने अनेक वळणे आयुष्यात घेतली आहेत. याच वळणांवर आधारित धोनी नावाच्या सुशांत सिंग राजपूतचा सिनेमा आला होता. यासाठी धोनीने ४५ कोटी घेतल्याचे सांगितले जाते.

अशाप्रकारे सिनेमाच्या माध्यमातून प्रतिमा उजळते आणि कमाईही होते, असा डबल फायदा सेलेब्रिटींचा होत असतो.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required