हा फोटो साक्ष आहे,युक्रेनच्या एका लहान मुलीची करुण कहाणीचा !

हा फोटो म्हणजे युक्रेनच्या एका लहान मुलीची करुण कहाणी आहे.या फोटोत सोन्या क्रिलाव्चुक ही पाच वर्षांची मुलगी स्वतःच्या हातानी वेदनाशामक इंजेक्शन घेताना दिसते आहे. तिच्या बाजूला तिची आई हताश होऊन पडलेली आहे.सोन्याच्या शरीरात कॅन्सर सर्वत्र पसरला आहे.तीन वर्षांपूर्वी सोन्याला ब्रेन ट्युमर झाला होता. तो केवळ ट्युमर नाही तर कॅन्सर आहे असे निदान झाल्यावर फेब्रुवारी २०२२ किव्हच्या हॉस्पीटलमध्ये केमोथेरपीची तारीख ठरली.पण त्याच दरम्यान रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर - नर्सींग स्टाफ युध्दभूमीवर सैनीकांच्या मदतीला गेले.सोन्याच्या पालकांना सोन्याला आता कोणतीही ट्रीटमेंट मिळणार नाही असे सांगण्यात आल्यावर सोन्याला घेऊन आईबाप पोलंडला गेले.पोलंडलाही काही वैद्यकीय मदत न मिळल्याने आईबाप तिला घेऊन घरी आले.तिच्या पोटावर इंजेक्शनन घेण्याची नळी -पोर्ट-लावून देण्यात आली होती.वेदना असह्य झाल्या की सोन्या स्वतःच्या हाताने पॅरासिटॅमॉलचे इंजेक्शन घायला शिकली.शेवट अपरिहार्य होता. २०२४ साली सोन्या गेली. युध्दाच्या सर्वच कथा रम्य नसतात.

सबस्क्राईब करा

* indicates required