computer

भारतातील 5 अश्या जागा जिथे भारतीयांवर बंदी आहे !!!

आपल्या देशात काही अशा जागा आहेत जिथं भारतीयांना प्रवेश नाही. स्वातंत्र्याला ७० वर्ष उलटून गेल्यानंतरही देशात अशी ५ ठिकाणं आहेत, जिथं भारतीय आलेले चालत नाही. हे वाचून तुमच्या मनात नक्कीच येईल की भारतीयांनी काय वाकडं केलंय याचं देवजाणे !

आपल्याच देशात राहून आपल्यालाच बंदी घालणारी ही कोणती ठिकाणं आहेत चला बघूया :

१. गोव्यातले फक्त परदेशी नागरिकांसाठी राखीव असलेले समुद्र किनारे!

गोव्यातील काही समुद्र किनारे फॉरेनर्ससाठी राखीव आहेत. भारतीय तिथे जाऊ शकत नाहीत. आणखी चीड येण्याची बाब म्हणजे इथले संचालक यामागचं कारण देताना म्हणतात की 'परदेशी स्त्रियांना वाईट नजरे पासून वाचवण्यासाठी आम्ही हा नियम आखला आहे'.

अर्थात काही ठरकी भारतीयांना पाहिलं की हा नियम बरोबर आहे असंही वाटायला लागतं!

२. युनो-इन हॉटेल !

हे बंगळूरूमधलं  जपानी हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये फक्त जपानी नागरिक येऊ शकतात असा इथला नियम होता. इतरांना इथं यायला बंदी आहे. सरकारला हा भेदभाव लक्षात येताच हॉटेलला टाळा ठोकण्यात आला.

३. कसोल, हिमाचल प्रदेश मधलं फ्री 'कसोल कॅफे'!

या कॅफेमध्ये परदेशातला पासपोर्ट दाखवल्यानंतरच एंट्री मिळते. म्हणजे भारतीयांवर बंदी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कॅफे भारतीय माणसाचाच आहे.

४. चेन्नईमधलं हॉटेल

हे एका नवाबचं हॉटेल आहे ,ज्यात फक्त आणि फक्त फॉरेन पासपोर्ट असलेलेच येऊ शकतात. वरील फोटोत दिसणाऱ्या पाटीवरून आपण अंदाज लावू शकतो.

5. पाँडीचेरीमधले काही 'ओन्ली फॉर फॉरेनर्स' वाले समुद्र किनारे !

गोव्यानंतरचं दुसरं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे पाँडीचेरी. फ्रेंच आणि इटालियन स्थापत्याचा मिलाप इथे पाहायला मिळतो. पण गोव्याप्रमाणेच इथल्या काही किनाऱ्यांवरती भारतीय आलेले चालत नाहीत.

 

तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आमच्याशी कमेंटबॉक्स मध्ये शेअर करू शकता!!!

सबस्क्राईब करा

* indicates required