मुलं हरवणारी ते किती ड्रिंकं घेतली हे विचारणारी, तुम्हांला सिनेमातली कोणती आई आवडते ?

आपले हिंदी मराठी-सिनेमे भारी मेलोड्रोमॅटीक असतात, तशाच त्या सिनेमातल्या आयापण. 
तुम्हांला यातली कुठली आई आवडते?

१. रत्नमाला 

Image result for ratnmala with dada kondkeस्रोत
या आईच्या नशिबी सगळ्या सिनेमात दादा कोंडकेसारख्या ईदरकल्याणी मुलाची आई होणं लिहिलं होतं. गावभर सगळ्यांना त्रास देऊन दादा कोंडके घरी आले की कधी प्रेमाने तर कधी काठी घेऊन ही आई तयार असायचीच.

२. निरूपा रॉय

Image result for nirupa royस्रोत
जगातल्या सर्वात वेंधळ्या आईचा जर एखादा पुरस्कार असेल, तर तो नक्कीच या आईला मिळेल. दर सिनेमात ही बाई आपली मुलं हरवत बसायची. एखादं मूल तिच्याकडे चुकून टिकलंच, तर मग शिवणकाम करून त्याला बीए फर्स्ट क्लास होईपर्यंत शिकवायची. एकाचवेळी तीन लोकांकडून रक्त घेण्याचा विश्वविक्रमपण यांचाच!!

३ सुषमा सेठ

Image result for sushma sethस्रोत
श्रीमंत ऋषी कपूरची श्रीमंत खानदानी आई. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली. यांनी काही खूप ग्रेट काम कधी केलं नाही, पण त्यांच्या वावरातच एक प्रकारचा खानदानीपणा होता

 

४. फरीदा जलाल

Image result for farida jalalस्रोत

ही नेहमीच मुलांना समजून घेणारी अशी प्रेमळ आई असते. आठवा डीडीएलजे मधले फरीदा आणि काजोलचे प्रसंग

 

5. रीमा लागू

Image result for reema lagooस्रोत

आयांना स्वयंपाक घरातून आणि तिथल्या गाजराच्या हलव्यापासून जर कुणी बाहेर काढलं असेल तर या मॉडर्न आईनं. 'मटर क्यू नहीं छिलेगी, अगर नहीं छिलेगी तो हम छिलवायएंगे' म्हणणारी मैने प्यार किया मधली आई  असो की हम साथ साथ है मधली पार्लरमध्ये जाणारी आई असो किंवा जाऊद्यांना बाळासाहेबमधली 'ए तुषार, किती ड्रिंकं झाली बाळासाहेबांची?' म्हणणारी आई असो, या सगळ्या छटा दाखवाव्या रीमा लागूंनीच !!

 

6. राखी

Image result for rakhi actress in karan arjunस्रोत
ही आई आपल्या मुलांना काय समजते काय माहीत!!
राम-लखन मध्ये मुलांनी व्हीलनसोबत मारामारी करावी म्हणून ' बदले की राह' बघत बसते. मुलं फायटिंग करताना मेली तर 'मेरे करण अर्जुन आयेंगे' करत त्यांना पुनर्जन्मानंतर पण सोडत नाही. बिच्चारी मुलं..

आता तुम्हीच सांगा, तुम्हाला सिनेमातली कोणती आई आवडते ?

सबस्क्राईब करा

* indicates required