'शेरखान खुद आया था और खुद चला जायेगा' - 'प्राण' चे काही हिट डायलॉग!!!
“इस इलाक़े में नए आए हो बरखुरदार, वरना यहां शेर खान को कौन नहीं जानता”. आपल्या खास शैलीमुळे आणि जोरदार अभिनयाच्या बळावर ‘प्राण’ हे एक कट्टर व्हिलन म्हणून समोर आले. एकेकाळी लोक आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवायला घाबरायचे. यावरून ‘प्राण’ या नावातली दहशत दिसून येते. या दहशतीचं वलय आपल्या अभिनयाच्या जोरावर तयार केलं ते प्राण किशन सिकंद ऊर्फ ’प्राण’ या कसदार अभिनेत्याने.
प्राण यांनी बॉलीवूड मध्ये ७० हून अधिक वर्षे काम करून ४०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. आश्चर्य म्हणजे चित्रपटात अप्रतिम व्हिलन रंगवणाऱ्या या अभिनेत्याची सुरुवात मात्र नूरजहान यांच्या बरोबर 'खानदान' (१९४२) या चित्रपटात नायकाच्या भूमिकेपासून झाली. राम और श्याम, खानदान, दुनिया, जिस देश मे गंगा बहती है, उपकार, जॉनी मेरा नाम, जंजीर, डॉन, साहिब, आँसू बन गये फूल, बेमान, बाल ब्रम्हचारी आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. राम और श्याम मधील खलनायकाच्या भूमिकेमुळे प्राण यांना खाजगी आयुष्यात देखील माणसं व्हिलन म्हणून बघू लागले. मात्र "उपकार'मधील मलंग चाचाच्या भूमिकेनंतर त्यांची पडद्यावरील प्रतिमा साफ बदलून गेली.
प्राण यांचा अभिनय लक्षात राहिला तो त्यांच्या बेदरकर संवाद फेकीमुळे. एकसे बढकर एक डायलॉग आणि तेवढेच भेदक डोळे, आवाजातला एक खास खर्ज आणि स्वतःच्या ताकदीची जाणीव करून देणारा वावर यामुळे प्राण आजही आपल्या लक्षात आहेत.
आज ‘प्राण’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त बघूया त्यांचे काही गाजलेले डायलॉग.
‘चोरों के ही तो उसूल होते हैं राजा ।‘
फिल्म : मजबूर (1974)
भारत, तू दुनिया की छोड़ ! पहले अपनी सोच! राम ने हर युग में जनम लिया है, लेकिन लक्ष्मण जैसा भाई दोबारा पैदा नहीं हुआ !'
फिल्म : उपकार (1967)
'आज की दुनिया में अगर जिंदा रहना है तो दुनिया के बटन अपने हाथ में रखने पड़ते हैं।'
फिल्म : शराबी (1984)
'राशन पर भाषण बहुत हैं ! भाषण पर कोई राशन नहीं! सिर्फ यह जब भी बोलता हूं, ज्यादा ही बोलता हूं, समझे !'
फिल्म : उपकार(1967)
‘लाशें जो खरीदा करते हैं, वो कौन बड़ा व्यापारी है... आसमान पे उड़नेवाले मिट्टी में मिल जाएगा.'
फिल्म : उपकार (1967)
'शेरखान की शादी नहीं हुई तो क्या हुआ? बारातें तो कईं देखी हैं।'
फिल्म : ज़ंजीर (1973)
'शताले-शताले मेरा भी समय आएगा...'
फिल्म : कश्मीर की कली (1964)
'शेरखान खुद आया था और खुद चला जायेगा।'
फिल्म : ज़ंजीर (1973)
'ओय भगतसिंह, ये भारत माता की होंदी है...मैंने इतने खून कित्ते भगतसिंह...'
फिल्म : शहीद (1965)
'मैं भी पुराना चिड़ीमार हूं, पर कतरना अच्छी तरह जानता हूं।'
फिल्म : शीशमहल(1950)
प्यार में तो बूढ़ा भी जवान लगता है ...लड़की शिरीन और लड़का फरहाद लगता है।
फिल्म : क़र्ज़ (1980)
'क़र्ज़ चुकाने वाले की याददाश्त अक्सर कमजोर हो जाया करती है ।'
फिल्म : क़र्ज़ (1980)
'और कर ले उपकार, मैंने कहा था पहले अपनी सोच. गांववाले तुझे जूतियों से मारेंगे और गिनेंगे तक नहीं।'
फिल्म : उपकार (1967)
'तेरा बाप राका'
फिल्म : जिस देश में गंगा रहता है (1961)
'टोक्यो में रहते हो पर टोकने की आदत नहीं गई।'
फिल्म : अराउंड द वर्ल्ड (1967)