computer

सतत हात धुणं, कुलूप पन्नासदा ओढून पाहाणं ही लक्षणं असलेली OCD म्हणजे काय? लक्षणं, प्रकार, उपचार सारं काही जाणून घ्या !!

सतत हातपाय धुणे, ते धुवूनही समाधान न होणे, कोरोनाच्या व्हायरसची लागण आपल्याला होईल या भीतीच्या सावटाखाली सतत राहणे, त्या भीतीपोटी घराबाहेर पडायलाच घाबरणे इत्यादी लक्षणे तुमच्यात किंवा तुमच्या घरातल्या लोकांमध्ये दिसत आहेत का ? तर वेळीच सावध होऊन त्याबद्दल माहिती घ्या, कारण ही ओसीडी(OCD) ची लक्षणे असू शकतात.

O.C.D अर्थात Obsessive Compulsive Disorder असं त्याचं शास्त्रीय भाषेतील नाव. मराठीत सांगायचं तर एखाद्या गोष्टीची अतिरेकी सवय. जणू काही त्या सवयीशिवाय आयुष्यात दुसरं काही शिल्लकच नाही. मराठीत त्याला मंत्रचळेपणा असा ही एक शब्द आहे. आपल्या आजूबाजूच्या वस्तू, माणसे आपल्या मनासारखं वागत नसली की त्यांच्याबद्दल मनात सतत विचार येणे, तसेच अतिस्वच्छतेच्या विचारातून अतिविचित्र सवयी लावून घेणे अशी काहीशी ओसीडीची साधारण उदाहरणं देता येतील. घाबरु नका! हा काही शारीरिक रोग नाहीये, तर ही एक मनाची अवस्था आहे. आणि योग्य मार्गदर्शनाने आणि उपचाराने त्यावर नियंत्रण मिळवता येते. एलन मस्क,डेव्हिड बॅकहॅम सारखे अनेक सेलेब्रिटी या OCD चे शिकार झाले आहेत आणि अनेकांनी त्यावर नियंत्रण मिळवलं आहे.

ओसीडीचे साधारण चार प्रकार आहेत.

Checking- सतत साशंक तपासणी करत राहणे. बाहेर जाताना घराला लावलेले कुलूप १०-१५ वेळा ओढून पाहाणे, झोपायच्या आधी अलार्म लावला की नाही हे पुन्हापुन्हा तपासणे, घरातल्या इतर सभासदांना वारंवार साशंक होऊन तेच ते प्रश्न विचारत राहणे आणि त्यांनी दिलेल्या उत्तराचे मूल्यमापन करत बसणे आणि पुन्हा नव्याने चौकशा करणे वगैरे वगैरे.

Contamination - अस्वच्छ गोष्टींची, जागेची भीती-किळस वाटणे, केवळ चाळा म्हणून हात धूत राहणं, घरात कुठे काय अस्वच्छ दिसतंय का याची पाहाणी करत राहणं आणि त्याचीच चिंता करणं, अशा सवयी  Contaminationच्या सदरात मोडतात. अर्थात सहा सवयी केवळ सध्याच्या काळातच नाही तर इतर वेळीही अशा सवयी बर्‍याच जणांना जडलेल्या असतात.

Symmetry - किचन कट्ट्यावरील वस्तू , डेस्कवरील सामान, कपाटातल्या फायली एका विशिष्ट पद्धतीनेच लावल्या पाहिजेत असा हट्ट असणे. यामध्ये अगदी साध्यासाध्या गोष्टींचा पण समावेश होतो. उदाहरणार्थ, खिशात ठेवायच्या रुमालाची घडी मनासारखी होईपर्यंत तेच ते प्रयत्न करत राहणे.

Ruminations and instrusive thoughts - एकाच पद्धतीचे व्यथित करणारे विचार येत राहाणे. उदाहरणार्थ,  आपल्या अस्वच्छतेमुळे कोरोनाची लागण आपल्याला होईल असं वाटत राहाणे. त्या विचाराची चाकोरी मोडण्यास नकार देणे हा त्यातला छळणारा भाग असतो. ओसीडी असलेल्या लोकांना त्यांच्या विचारांचा त्रास होत असतो. त्यांना माहीत असतं की हे येणारे विचार आपल्यालाच त्रासदायक ठरणार आहेत. तरीही ते विचार करायचं थांबवू शकत नाहीत आणि जेव्हा थांबवतात तेव्हा त्याचा त्यांना एवढा त्रास होतो की ते विचार पुन्हा सुरू होतात.

OCD मध्ये मुख्यत्वे दोन भाग आहेत. पहिला Obsessive thoughts चा आणि दुसरा Compulsive habits चा.

Obsessive thoughts (पछाडून टाकणारे विचार)  - यामध्ये स्वतःबद्दल आणि आपल्या जवळच्या लोकांबद्दल उगीच काळजी करत बसणे, सध्याच्या कालखंडात श्वासोच्छश्वासाची लय मोजत बसणं, कानावर पडलेली रोगाची लक्षणे आपल्यात दिसत आहेत का हे तपासत बसणं, आजूबा़जूला असणार्‍या, नजरेस पडणार्‍या वस्तू-घटना यांचा आपल्यासोबत संबंध जोडत बसणं, स्वप्न याबद्दल विचार करत राहाणे यांचा समावेश होतो.

Compulsive habits (अनावश्यक पण मानसिक अनिवार्यतेमुळे जडलेल्या सवयी)  यामध्ये प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट पद्धतीनेच करण्याचा हट्ट करणे, पायऱ्या मोजायची सवय लागणे, लोकांनी वापरलेल्या गोष्टींना स्पर्श करायची भीती वाटणे इत्यादींचा समावेश होतो. पहिला विश्वकोश निर्माण करणार्‍या सॅम्युएल जॉन्सनला अशा बर्‍याच सवयी होत्या.

उपचार - ओसीडीवर औषधाच्या रुपात उपचार नाहीत. परंतु योग्य मार्गदर्शनाने आणि निर्धाराने आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. फिजीओथेरपी, मेडिटेशन या कामी खूप साहाय्यक ठरतं. पण अशा सवयी लागण्यापूर्वीच सावध राहणे हे सगळ्यात बेष्ट आहे !

सबस्क्राईब करा

* indicates required