computer

या १० आलिशान राजवाड्यात राहण्याची संधी तुम्हांला मिळू शकते राव !!

मंडळी आजच्या काळात राजे नाहीत पण त्यांचे राजवाडे शिल्लक आहेत. हे राजवाडे एकतर म्युझियम मध्ये बदलण्यात आलेत किंवा त्यांना हॉटेलचं रूप दिलं गेलंय. आपण जरी राजघराण्यातील नसलो तरी या हॉटेल कम राजवाड्यांमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. पण तिथे राहण्यासाठी आपल्याला मोठी रक्कम मोजावी लागते मंडळी. त्यामुळे या राजवाड्यांमध्ये प्रत्येकालाच राहता येत नाही.

मंडळी, आज आपण जगातील १० आलिशान महालांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे फक्त श्रीमंतच राहू शकतात.

१. इन्वेरलोची हॉटेल, स्कॉटलंड

स्कॉटलंडच्या निसर्गरम्य जागी हे हॉटेल वसलेलं आहे. इथलं निसर्गरम्य वातावरण व कॅमेऱ्यात कैद करण्यासारखं सौंदर्य पर्यटकांना मोहून टाकतं.
 

२. क्लॅरेन्स किल्ला, दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेत असलेला हा लहानसा किल्ला जगभर प्रसिद्ध आहे. लहानश्या पार्टीसाठी हा किल्ला बेस्ट चोईस मानला जातो. पण किंमत देखील मोठी मोजावी लागते मंडळी. या किल्ल्याला भेट दिलेल्या माणसांनी तिथल्या निसर्गरम्य वातावरणाची व आदरातिथ्याची भरभरून प्रशंसा केली आहे.
 

३. Hotel Schloss Thannegg, ऑस्ट्रिया

ऑस्ट्रिया मध्ये असलेल्या या हॉटेल कम राजवाड्याला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ असते हिवाळ्याची. हिवाळ्यात बर्फाच्छादित वातावरणामुळे हा राजवाडा परीकथेतील राजवाड्याप्रमाणे भासतो.

४. अॅश्फोर्ड किल्ला, आयर्लंड

अॅश्फोर्ड किल्ला तब्बल ३५० एकर जागेत वसलेला असून किल्ल्यात ८३ खोल्या आहेत. किल्ल्याची निर्मिती १२२८ साली झाली असल्याने त्याकाळातील अनेक गोष्टी या किल्ल्यात समाविष्ट आहेत. अॅश्फोर्ड  मध्ये प्रवेश केल्यानंतर आपण इतिहासात मागे जातो. अनेक सेलिब्रिटींनी राहण्यासाठी या किल्ल्याची निवड केली आहे.

५. उम्मैद भवन पॅलेस, जोधपुर

भारतातील जोधपुरचा उम्मैद भवन राजमहाल राजपुती शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. २६ एकर मध्ये पसरलेला हा किल्ला आता पंचतारांकित हॉटेल म्हणून सगळ्याचं स्वागत करतो. किल्ल्याच्या काही भागाचं म्युझियममध्ये रुपांतर करण्यात आलेलं आहे.

६. Castello di Pavone, इटली

हा किल्ला सुरुवातीला चर्च होता. पुढे जाऊन त्याचं रुपांतर किल्ल्यात अरण्यात आलं. आणि आता हा किल्ला हॉटेल म्हणून ओळखला जातो. या किल्ल्यात २७ खोल्या आहेत.

७. डॅलीयन किल्ला, चीन

बव्हेरियन पद्धतीचा डॅलीयन किल्ला तिथल्या आलिशान सेवेसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्यात २९२ खोल्या असून आरामदाई आणि सुखवस्तू जीवनासाठी डॅलीयनची निवड केली जाते. 

८. Aldourie Castle, स्कॉटलंड

१६२६ साली एक लहानशी ‘गढी’ म्हणून हा किल्ला ओळखला जायचा. पुढे त्याला किल्ल्याचं रूप देण्यात आलं. आधुनिक काळात त्याला रेसॉर्ट मध्ये रुपांतरीत करण्यात आलं आहे. 

९. रोश्च किल्ला, इंग्लंड

रोच किल्ला बांधला गेला १२ व्या शतकात. पुढे तो अनेकांची जहागीर बनला. १९०० च्या काळात त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली. आता त्याचं रुपांतर ६ खोल्यांच्या आलिशान हॉटेल मध्ये करण्यात आलेलं आहे. 

१०. Château Frontenac, कॅनडा

कॅनडा मधील हे हॉटेल वरवर किल्ल्यासारखं दिसत असलं तरी तो खराखुरा किल्ला नाही. १९ व्या शतकात ‘कॅनडियन पॅसेफिक रेल्वे’ नामक कंपनीच्या ऑफिसच्या रुपात त्याची निर्मिती करण्यात आली होती. बांधून झाल्यानंतर अनेक वर्षांनी त्याचं रुपांतर ६०० खोल्यांच्या हॉटेल मध्ये करण्यात आलं. आज या हॉटेलची गणना कॅनडाच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये केली जाते.

सबस्क्राईब करा

* indicates required