जीन्स चक्क मजुरांसाठी तयार करण्यात आली होती? लिवाइजबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
लिवाइज असा ब्रँड आहे ज्याला कुठल्याही ओळखीची गरज राहिलेली नाही. लिवाइजकडून अनेक प्रकारचे कपडे बनविले जातात. पण लिवाइजच्या जीन्सने जी हवा केली त्याला मात्र तोड नाही. कम्फटेर्बल असल्याने लिवाइज जीन्सला अधिकांश लोकांची पसंती असते. पण या कंपनीबद्दल अनेक गोष्टी आजही लोकांना माहीत नाहीत. अशाच काही गोष्टी आम्ही आज तुमच्या समोर आणणार आहोत.
१) लिवाइज स्ट्रॉस या जर्मन अमेरिकन बिजनेसमॅनने १८५३ साली या कंपनीची स्थापना केली होती. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण आज उच्चभ्रू लोकांची पसंती असलेली लिवाइजची जीन्स त्याकाळी मजुरांसाठी बनवली गेली होती. काम करताना मजुरांना लवकर न फाटणाऱ्या मजबूत कपड्यांची गरज होती. तत्कालीन मजुरांची संख्या बघता लिवाइज स्ट्रॉसला यात मजबूत मार्केट दिसले आणि त्यांनी या क्षेत्रात उडी मारली.
(लिवाइज स्ट्रॉस)
२) आता ही जीन्स मजुरांसाठी बनवली म्हटल्यावर लिवाइज स्ट्रॉस सारखा श्रीमंत उद्योगपती ही जीन्स कशी घालणार? जरी ती त्यांच्याच कंपनीकडून बनविण्यात आली असली तरी. स्वतः लिवाइज स्ट्रॉस यांनी आयुष्यभर ही जीन्स घातली नाही. ते आयुष्यभर सूट पॅन्टमध्येच वावरत असत.
३) १९३४ साली लिवाइज ब्लु जीन्स घेऊन आले. विशेष म्हणजे ही महिलांसाठी बाजारात आणण्यात आली होती. या जीन्सला निळा कलर देण्यासाठी 3 ते 12 ग्रॅम निळचा उपयोग केला जात असे.
४) आधी पॅन्टसमध्ये झिपच्या जागी बटन असायचे पण ही पद्धत बदलत लिवाइजने झिप आणली. महिलांच्या जीन्समध्ये देखील ही पद्धत आणली गेली. पण ही गोष्ट अनेकांना रुचली नाही. लिवाइजवर या कारणावरून टीकेची मोठी झोड उठली. पण लिवाइजने मात्र ही गोष्ट काय बदलली नाही. पुढे ही फॅशन झाली आणि सगळीकडेच बटनांऐवजी झिपचा वापर सुरु झाला.
५) लिवाइज जीन्सची विशेष ओळख म्हणजे पँटच्या मागील बाजूस कमरेवर असणारा लाल टॅब आणि ब्रँड लोगो. दुसऱ्यांच्या मानाने आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी हे यामागील कारण होते. सुरुवातीला अनेक वर्ष तर हे बॅच लेदरचे वापरण्यात येत असे.
६) लिवाइज जीन्सची सर्वात जुनी जोडी आजही सुरक्षितपणे सॅन फ्रान्सिस्को येथील एका म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. हे जीन्स 1879 साली तयार करण्यात आले होते. त्यांची किंमत ही तब्बल दीड लाख डॉलर एवढी प्रचंड आहे. आजही जर त्या जीन्स बघितल्या तर आजच्या जीन्स आणि त्या जीन्स यात विशेष असा फरक दिसत नाही.
७) १९०१ साल उजाडेपर्यंत लिवाइज जीन्सला आजच्यासारखे मागे पुढे २-२ खिसे नव्हते. तेव्हा फक्त मागच्या बाजूला एक खिसा होता.
८) १९०६ साली आलेल्या जोरदार भूकंपात लिवाइजच्या सॅन फ्रान्सिस्को येथिल दोन फॅक्टऱ्या पूर्णपणे नष्ट झाल्या होत्या. या फॅक्टऱ्यांमध्ये असलेले लिवाइजच्या अनेक महत्वाच्या गोष्टी नष्ट झाल्या होत्या.
९) लिवाइजला जगात ओळख मिळाली ती लिवाइज जीन्स घालून अनेक हॉलिवूड हिरो वावरू लागले त्यानंतर. पहिल्यांदा १९५३ साली द वाईल्ड वन सिनेमात मार्लन ब्रँड याने लिवाइज घातली, त्यानंतर १९६१ साली द मिसफिट मध्ये मॅरिलीन मन्रो, १९८५ साली बॅक टू द फ्युचरमध्ये मायकल फॉक्स, २००५ साली ब्रोकबॅक माऊंटन मध्ये हेथ लेजर, २०१५ साली मायकल मिसफेंडर याने स्टीव्ह जॉब्स चरित्रपटात, या प्रकारे अनेक सिनेमांमध्ये झळकणाऱ्या या जीन्सने लोकांना भुरळ घातली.
१०) लिवाइजला आज जगात जीन्स म्हणून ओळखले जात असले तरी जीन्स हे नाव येण्यापूर्वी त्याचे नाव ओव्हरऑल होते. १९५५ साली जेम्स डिन या हॉलिवूड सुपरस्टारने आपल्या रेबेल विदाऊट अ कॉज या सिनेमात घातलेल्या लिवाइजमुळे तरुणांमध्ये या जीन्सचे मोठे क्रेज झाले. तरुणांमध्ये ओव्हरऑल हे मोठे नाव बोलण्याऐवजी जीन्स हे सोपे नाव बोलण्याचा ट्रेंड आला आणि तेव्हापासून हे नाव रूढ झाले.
तुम्हाला लिवाइजबद्दलच्या या १० गोष्टी कशा वाटल्या? तुम्हाला आणखी कोणत्या कंपनी/ब्रँडबद्दल जाणून घ्यायला आवडेल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा.