computer

नेटस्मार्ट : गुगल वर सर्च करण्याच्या १० अफलातून पद्धती !!

माहिती मिळवण्याचं सर्वात सोप्पं साधन म्हणजे गुगल. गुगल बाबाला सध्या तरी जगात तोड नाही. आपल्या मनातला कोणताही प्रश्न आपण तिथे विचारू शकतो, जगातील कोणतीही माहिती मिळवू शकतो, व्हिडीओ, फिल्म्स, माहिती, मनोरंजन, फॅशन, पुस्तके, राजकारण, इतिहास, इत्यादी इत्यादी...पण, सगळी माहिती एकत्र, एकाच वेबसाईट वर मिळत असली तरी काहीवेळा आपल्याला नेमकी जी माहिती हवी असते तीच मिळत नाही.

असं का? याचं कारण म्हणजे गुगलवर सर्च करण्याची सुद्धा एक टेक्निक आहे !! कोणती? 

तर मंडळी, आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत. खालील दिलेल्या १० पद्धतीने तुम्ही गुगलवर आपल्याला हवी ती माहिती पटकन मिळवू शकता.
चला तर होऊया ‘गुगल स्मार्ट’ होऊ शकता !!!

१. हे किंवा ते

काही वेळा आपल्याला खात्री नसते की जी माहिती आपण शोधत आहोत त्यासाठी आपण नेमकं काय सर्च केलं पाहिजे. अशावेळी सर्चसंबंधी आठवत असलेले दोन किंवा अधिक शब्द सर्च बॉक्समध्ये टाकून दोन्ही शब्दांच्या मध्ये ‘or’ किंवा दोन्ही शब्दांना ‘‘|’’ सिम्बॉलने वेगळं करायचं.यानंतर गुगल आपल्याला आपल्या दोन्ही पर्यायांविषयी माहिती देतं.

२. समानार्थी शब्द वापरून सर्च करणे.

सहसा गुगलवर आपण काहीही सर्च केल्यावर आपण दिलेल्या शब्दाशी जुळेल अशी माहिती ज्या-ज्या ठिकाणी असेल, त्या-त्या सर्व जागांची माहिती गुगल आपल्यासमोर ठेवतं. पण काहीवेळा आपल्याला ठराविक विषयावरची वेबसाईट हवी असते, पण ती कशी शोधावी हाच प्रश्न असतो. अशावेळी दोन समानार्थी शब्दांच्या मध्ये " ~ " सिम्बॉल टाकून सर्च केल्यास आपल्याला पाहिजे त्या विषयाची वेबसाईट आपल्यासमोर येते. याचं एक उदाहरण तुम्ही खाली बघू शकता.

३. ठराविक वेबसाईटवरची माहिती शोधणे.

काहीवेळा एखाद्या वेबसाईटवर आपण माहिती वाचतो आणि काहीकाळाने विसरून जातो. मग पुन्हा तीच माहिती आपल्याला हवी असेल तर गुगलवर सर्च करावं लागतं. यासाठी सोप्पी पद्धत म्हणजे, आपण ज्या वेबसाईटवर माहिती वाचली होती त्या वेबसाईटची URL लिहून त्यापुढे त्या माहितीशी निगडीत शब्द टाकल्यास ती माहिती थेट त्या वेबसाईटवर सर्च होते. या टेक्निकमुळे आपल्याला गुगलच्या अनेक पर्यायात अडकून न राहता सरळ हवी ती गोष्ट मिळवता येते.

४. स्टारचा वापर

समजा आपल्याला एक वाक्य सर्च करायचं आहे पण त्या वाक्यातला एखादा शब्द आठवत नाही. मग अशावेळी काय करायचं? तर त्या माहित नसलेल्या शब्दाच्या जागी ‘*’ स्टार लिहून सर्च करायचं. मग गुगल आपली बुद्धी लावून योग्य ते आपल्यासमोर ठेवतं. सिम्पल...

५. रिकाम्या जागा भरा

काहीवेळा जी माहिती शोधायची असते त्या संदर्भात आपल्याला खूप अस्पष्ट आठवत असतं किंवा सुरुवातीचं आणि शेवटचेच शब्द फक्त आठवत असतात. पण मधले शब्द आपण विसरलेलो असतो. अशावेळी सुरुवातीचा शब्द आणि शेवटचा शब्द लिहून मधोमध AROUND + (मधल्या शब्दांची संख्या) लिहून सर्च केल्यास गुगल अपोआप गाळलेल्या जागा भरून तुमची माहिती समोर ठेवतं. खालील उदाहरणात तुम्ही हे पाहू शकता.

६. ठराविक काळातली माहिती शोधणे.

एखाद्या विशिष्ट काळात घडलेली एखादी घटना किंवा त्या दरम्यानची विशिष्ट माहिती मिळवायची असल्यास आपल्याला गुगलवर अनेक पद्धतीने सर्च करावं लागतं. यावर सोप्पी पद्धत म्हणजे दोन शब्दांच्यामध्ये तीन टिंब द्यायचे. म्हणजे समजा आपल्याला १९४७ ते १९९९ पर्यंत झालेल्या भारताच्या राष्ट्रपतींची माहिती काढायची असल्यास सर्च बॉक्स मध्ये “presidents of ईndia 1994…1999” असं लिहावं लागेल.

७. ठराविक संदर्भातील लेख शोधणे.

ठराविक शब्दाचं शीर्षक असलेला लेख शोधायचा असल्यास intitle: लिहून त्यापुढे तो ठराविक शब्द लिहून सर्च केल्यास गुगल आपल्या समोर आपण लिहिलेला शब्द शीर्षक असलेला लेख आपल्या समोर ठेवतं. याच प्रकारे inurl: लिहून वेबसाईट मधून आपण ठराविक माहिती मिळवू शकतो.

८. दोन समान वेबसाईट शोधणे

जर तुम्हाला एखादी वेबसाईट आवडली आणि त्याचसारखी आणखी एक वेबसाईट शोधायची असेल तर सर्च बॉक्स मध्ये ‘related:’ हा शब्द लिहून त्यापुढे आपल्याला ज्या वेबसाईट सारखी वेबसाईट शोधायची आहे तिचं नाव लिहावं लागेल. म्हणजेच related:nike.com

९. आपल्याला हवं तेच शोधणे

आपण जेव्हा गुगलवर माहिती शोधतो तेव्हा आपण दिलेल्या शब्दाशी जुळेल अशी सर्व माहिती गुगल आपल्यासमोर आणून ठेवतं. पण यात अनेकदा आपल्याला हवी तीच माहिती आपल्याला मिळते असं होत नाही. त्यासाठी सर्च करताना लिहायच्या शब्दांना अवतरण चिन्ह दिल्यास फक्त आणि फक्त त्याच शब्दाशी जुळेल अशी माहिती समोर येते.

१०. सर्च रिझल्टमधून नको असलेले पर्याय काढून टाकणे.

माहितीच्या जंजाळातून आपल्याला हवी तीच माहिती गळून घेणे हे किचकट काम पुढील पर्यायाने सोप्पं होईल. समजा आपण सर्च करत आहोत. interesting books. पण आपल्याला फक्त त्यांची माहिती हवी आहे पण ती विकत घ्यायची नाहीत. अश्यावेळी वजा ' - ' चिन्ह लिहून त्या त्यापुढे Buy हा शब्द लिहिल्यास रिझल्ट मधील पुस्तके विकत घेण्यासंबंधी सर्व माहिती गाळली जाईल.

 

ट्राय करून बघा राव !!!

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required