computer

गाठीचे शास्त्र...गाठीचे हे ६ सोपे आणि उपयोगी प्रकार शिकून घ्या!!

मनाशी खूणगाठ बांधली हा शब्दप्रयोग आपण बर्‍याच वेळा वापरतो तेव्हा आपल्याला असं म्हणायचं असतं की आता मी अमुक एक गोष्ट नक्कीच करेन किंवा करणार नाही. म्हणजेच मनाशी केलेली प्रतिज्ञा आपण त्या घट्ट गाठीच्या स्वरुपात बघत असतो. आता तुम्ही तरुण असाल तर गाठ म्हणजे मनात लगेच 'रेशीमगाठी' वगैरे विचार येतीलच, पण आजचा गाठी मारण्याचा विषय थोडा वेगळाच आहे.

तुम्ही शेती- पशुपालन या क्षेत्रात काम केलं असेल तर 'बैलगाठ' तुमच्या परिचयाची असेल. अशा शेकडो प्रकारच्या गाठी आहेत. इतक्या प्रकारच्या गाठी असतात का असतात आणि असतात का? असा तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर होय असंच आहे.

अगदी आदीमानवाच्या काळापासून गाठी मारण्याची कला -विद्या विकसित झाली आहे. शिवण-टिपण करण्याच्या आधीची कला म्हणजे गाठी मारणे! त्यामुळे प्रत्येक क्षेत्राच्या गरजेनुसार गाठी बांधायची पध्दत आहे. पण आता या गाठीची निरगाठ होण्यापूर्वी आपण काही प्रकार बघूया!

दोर्‍या वापरून गाठी मारणं आणि त्या उलगडणं हे एक शास्त्र आहे. शेकडो प्रकारच्या गाठी आहेत. त्यांना वेगवेगळी नावं आहेत. दोरी-रस्सी कोणती वापरायची -जाडी किती असावी -लांबी किती असावी या सगळ्याचा विचार या शास्त्रात केला जातो. जसे कामाचे स्वरुप असेल त्याप्रमाणे गाठ बांधावी लागते. काही प्रकारांची यादी आम्ही सोबत देत आहोत. ही यादी तुम्ही वाढवू शकता.

१. रेस्क्यू आणि सर्च बचत कार्यासाठी

२. गिर्यारोहण

३. मासेमारी

४. पाळीव जनावरांसाठी

५. अवजड सामान हलवण्यासाठी

६. घरगुती कामासाठी

असे अनेक अत्यावश्यक प्रकार आहेत .काही वेळा भेटवस्तू देण्यासारख्या कामासाठी रिबनच्या गाठी बांधाव्या लागतात, तर टायच्या बांधायच्या गाठी हा तर एक वेगळाच विषय आहे.

या क्षेत्रात काम करणार्‍यात इंग्लंडच्या 'ग्रॉग' या कुटुंबाचे नाव प्रामुख्याने आढळून येते. यांचे एक पूर्वज नाविक दलात अ‍ॅडमिरलच्या हुद्द्यावर होते. त्याकाळी नौदलात मुख्यतः दोर्‍यांचा वापर होत असल्याने त्यांनी अनेक गाठींच्या प्रकाराच्या नोंदी ठेवून अभ्यास केला होता. आता ३ पिढ्यांनंतरही हा अभ्यास त्यांच्या कुटुंबाने चालू ठेवला आहे. आज तुमच्यासमोर काही गाठींचे नमुने आम्ही देत आहोत ते त्या अभ्यासातूनच घेतलेले आहेत..

सबस्क्राईब करा

* indicates required