computer

सिंगापूरमधली बंदी माहित असेल, पण बबलगमबद्दल या इतर १५ गोष्टी तुम्हांला हमखास माहित नसतील!!

लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वानाच च्युईंगम तोंडात ठेवून ते चघळत राहायला आवडते. आज आम्ही या लेखातून या बबलगमबद्दल काही भन्नाट गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. गुलाबी रंगाचा हा छोटासा पदार्थ आजवर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. जगभर याचे चाहते आहेत. विशेष म्हणजे सर्वच वयोगटातील लोकांना याचे आकर्षण आहे. मात्र च्युईंगम आणि बबलगम यातील फरक अनेक लोकांना कळत नाही. दोन्हींतही एक मुलभूत फरक आहे, तो म्हणजे याचा गम बेस. च्युईंगमसाठी वापरला जाणारा बेस हा नैसर्गिक पद्धतीचा असतो. त्याला चिकल म्हटले जाते. तर बबल गमसाठी वापरला जाणारा बेस हा कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेला असतो. यासाठी स्टार्च आणि पॉलीमर्सचा वापर केला जातो. याव्यतिरिक्तही या बबलगम आणि च्युईंगमबद्दल आपल्याला सहसा माहित नसलेल्या गोष्टी पाहा..

१) दरवर्षी जगभर १,००,००० टन एवढा च्युईंगम चघळला जातो.

२) पूर्वी ग्रीक लोक तणावातून थोडासा विरंगुळा म्हणून रेझीनपासून बनवलेला गम चघळत असत. 

३) बबलगम चघळल्याने मनावरील ताण हलका होतो आणि एकाग्रता वाढवण्यासही याचा उपयोग होतो असे म्हटले जाते.

४) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्यानुसार आतापर्यंत फुगवलेला सर्वात मोठा बबल हा २३ इंच व्यासाचा होता.

५) सर्वात पहिला बबलगम हा गुलाबी रंगाचा होता. कारण बबलगम बनवणाऱ्याकडे फक्त तोच रंग शिल्लक राहिला होता.

६) च्युईंगम चघळण्यासाठी अमेरिकन लोक दररोज जेवढी ऊर्जा खर्च करतात तितकी ऊर्जा एकत्र केल्यास एक कोटी लोकसंख्या असलेल्या शहराला पुरेसा वीज पुरवठा होऊ शकतो.

७) ब्लीबर-ब्लबर या नावाने पहिल्यांदा बबलगम मार्केटमध्ये आला.

८) आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे जर तुमच्या केसात बबल गम अडकला असेल तर तो तुम्ही पीनट बटरच्या सहाय्याने काढू शकता.

९) १९४० पर्यंत बबलगम एवढा रुळला होता की अमेरिकन सैनिकांच्या रेशन कीटमध्येही याचा समावेश करण्यात आला होता.

१०) तुम्हालाही बबलगमचा मोठ्यात मोठा फुगा बनवायची इच्छा आहे? मग पाच बबलगम घ्या आणि त्यात एक चमचा पीनट बटर मिसळा. दोन्हीही चांगले मिक्स होईपर्यंत चघळा. गम कडक झाल्यावर दोन्ही ओठांच्या मध्ये धरून त्यात फुंकर मारा. सावकाशपणे बबल फुगवत न्या. या पद्धतीने तुम्हीही मोठ्यात मोठा बबल फुगवू शकता.

११) बबलगमपासून होणारा कचरा स्वच्छ करण्यासाठी दरवर्षी ७५,००० डॉलर खर्च येत असल्याचे कारण देऊन १९८३ साली सिंगापूर सरकारने बबलगम वर बंदी आणली होती. १९९२सालापासून तिथे बबलगम विकणे बेकायदेशीर आहे आणि अजूनही ही बंदी उठवण्यात आलेली नाही आहे.

१२) आफ्रिकेतील काही जमाती लग्नात हुंडा म्हणून मोठ्या प्रमाणात बबलगम घेतात असे म्हटले जाते.

१३) सर्वसाधारणपणे एका वर्षात एक व्यक्ती ३०० गम तरी चघळत असेल.

१४) सलग आठ तास १३५ गम चघळून रिचर्ड वॉकरने चॉंप टायटल मिळवले होते. स्यू जॉर्डन हा पहिला व्यक्ती आहे ज्याने सलग पाच तास बारा मिनिटे आठ गम चघळून चॉंप टायटल पटकावला होता.

१५) फिलाडेल्फिया च्युईंगम कंपनीचे मुख्य एडवर्ड एल. फेनिमोर यांनी एकात एक एकात एक असे एकावेळी एकदम तीन बबलगम फुगवले होते.

१६) बबलगम बद्दलची एक अफवा म्हणजे बबलगम किंवा च्युईंगम पोटात गेल्यास तो सात वर्षे आतड्यांना चिकटून राहतो. तर असे अजिबात होत नाही. मुळात मानवी आतड्यांना बबल गम किंवा च्युईंगम पचवताच येत नाही, त्यामुळे तो पोटात गेला तरी आहे तसा बाहेर पडतो.
बबलगम बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का? या व्यतिरिक्त तुमच्याकडे बबलगम बद्दल आणखी काही माहिती असेल तर आमच्यासोबत नक्की शेअर करा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required